पुलवामा हल्ल्यावर राहुल गांधी आणि पाकिस्तानची भाषा एकच - अमित शहा

पुलवामा हल्ल्यावर राहुल गांधी आणि पाकिस्तानची भाषा एकच  - अमित शहा

'काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लोकांनी आता आपलं मत बनवलं आहे.'

  • Share this:

निझामाबाद 6 मार्च  : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची तेलंगणातल्या निझामाबाद इथं महाआघाडीवर हल्लाबोल करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केलीय. अमित शहा यांची तेलंगणातल्या निझामाबाद इथं जाहीर सभा झाली त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केलाय.

ते म्हणाले, "काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लोकांनी आता आपलं मत बनवलं आहे. मी जीथे कुठे जातो तिथे मला हाच प्रचंड प्रतिसाद मिळतो. महाआघाडीला मी विचारू इच्छितो की त्यांचा नेता कोण आहे? ही महाआघाडी सत्तेसाठी हपापलेली आहे. त्यांना देशाच्या विकासाचं काहीही देणं घेणं नाही."

"पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये खोल घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांचे तळ उध्वस्त केलेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांविरूद्ध तातडीने कारवाईचा निर्णय घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा आदर आणखी वाढला आहे."

"राहुल गांधी आणि विरोधी पक्ष हवाई हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी आणि पाकिस्तानी माध्यमांची भाषा एकच आहे. कुणालाही त्यात फरक दाखवता येणार नाही."

"राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू आणि के.सी. चंद्रशेखर राव यांनी अवैध स्थलांतर करणाऱ्या धोरणांबाबत आपलं धोरण जाहीर करावं,"

"राहुल गांधी आज तेलुगू अस्मिते बद्दल बोलत आहेत. मात्र काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अंजनेय्याजी यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचं पार्थिव दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात सुद्धा आणू दिले गेलं नाही, हे लोक विसरलेले नाहीत."

First published: March 6, 2019, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading