S M L

इंदिरा गांधींकडे 18 राज्यं होती, आमच्याकडे 19 ; मोदी झाले भावुक

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयानंतर बुधवारी दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2017 07:04 PM IST

इंदिरा गांधींकडे 18 राज्यं होती, आमच्याकडे 19 ; मोदी झाले भावुक

20 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयानंतर बुधवारी दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1984 मध्ये भाजपच्या 2 जागा आणि आजपर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देताना भावूक झाले.

संसद परिसरातील लायब्ररी बिल्डिंगमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपच्या संसदीय मंडळाची जवळपास 1 तास बैठक सुरू होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांशी संवाद साधला. भाजपसाठी हा विजय खूप मोठा आहे. आता 19 राज्यात भाजपचे सरकार आहे. ज्यावेळी इंदिरा गांधी यांची सत्ता होती तेव्हा त्यांच्या काळात 18 राज्यात काँग्रेसची सत्ता होती असं यावेळी मोदी म्हणाले.

या बैठकीत गुजरात आणि हिमाचलमधील विजयाबद्दल चर्चा झाली. गुजरातमध्ये झालेला संघर्ष यावरही चर्चा झाल्याचं कळतंय. गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. तर हिमाचलमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेम कुमार धूमल पराभूत झाले. गुजरातमध्येही विजय रुपानी यांना अनेक अडचणींना सामना करावा लागलाय. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झालीये.या बैठकीनंतर भाजपचे खासदार विरेंद्र सिंह मस्त यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी आमच्यासोबत भाजपच्या संघर्षाची आठवण करून दिली ती आमच्यासाठी खूप मोलाची आहे. त्यांचं भाषण आमच्यासाठी प्रेरणादायी असून पुढील काळात आमचे कार्यकर्ते आणखी जोमाने कार्य करतील असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. तसंच जेव्हा एखादा कार्यकर्ता तळातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतो अशा वेळी भावूक होणे साहजिक आहे असंही सिंह म्हणाले.

दरम्यान, संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचलेले पंतप्रधान मोदी यांना अध्यक्ष अमित शहा यांनी लाडू भरवून गुजरात आणि हिमाचल निवडणुकीसाठी अभिनंदन केलंय.

या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते. या बैठकीसाठी आलेले कृषि राज्यमंत्री कृष्णा राज यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना स्ट्रेचर वरून आरएमएल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close