शिवसेनेला दिलासा, अखेर जगन रेड्डींनी केला खुलासा

शिवसेनेला दिलासा, अखेर जगन रेड्डींनी केला खुलासा

जगन यांच्या या खुलाशामुळे शिवसेनेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत होणार आहेत.

  • Share this:

हैदराबाद 14 जून : भाजप  लोकसभेचं उपाध्यक्षपद वायएसआर काँग्रेसला देण्याच्या तयारीत आहे असं म्हटलं जात होतं. शिवसेनेला हे पद मिळावं अशी इच्छा आहे. मात्र सेनाला डावलून वायएसआर काँग्रेसला भाजपने ऑफर दिल्याने शिवसेना नाराज झाली अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनीच याचा खुलासा केलाय. भाजपने उपाध्यक्षपदाची ऑफर दिली नाही आणि आमचीही तशी कुठली मागणी  नव्हती असं जगन रेड्डी यांनी स्पष्ट केलं. दक्षिणेत पक्ष विस्तार करण्यासाठी हे पद वायएसआर काँग्रेसला देण्याचा भाजपचा विचार आहे असं बोललं जात होतं. या आधी अण्णा द्रमुकच्या थंबीदुरई यांना हे पद भाजपने दिलं होतं. जगन यांच्या या खुलाशामुळे शिवसेनेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत होणार आहेत.

राज्यात शिवसेनेला काय मिळणार?

राज्यातला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. या विस्तारात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रतिनिधीत्व मिळेल असंही ते म्हणाले. लवकरच सगळ्यांना गोड बातमी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात होतं. असं गाजर दाखवून असंतुष्टांना शांत ठेवण्याची ही राजकीय खेळी होती असंही बोललंय जात आहे.

पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

बारामती-माढ्याच्या पाणीप्रश्नावरून वाद उफाळून आला आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीस मिळणारे पाणी आता माढ्याकडे वळवले गेले आहे. यावरून बारामती विरुद्ध माढा असा राजकीय रंग दिला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून महाराष्ट्रात तरी पाण्याचे राजकारण घडू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'राजकीय सभ्यता पाळण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून माढा, सांगोला वगैरे भागासाठी वळविलेल्या पाण्याला बारामती विरुद्ध माढा असा रंग मिळणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. निदान महाराष्ट्रात तरी पाण्याचे राजकारण घडू नये. निवडणुकांत पैशांचा पाऊस पडतो, पण निसर्ग कोपल्यामुळे तलाव, धरणे व जलशिवारांची डबकी होतात. तेव्हा जे पाणी निसर्गकृपेने मिळाले आहे ते सर्वांना न्याय्य पद्धतीने कसे मिळेल हे पाहायला हवे. पाण्याला कोणीच बाप नाही हे महत्त्वाचे', असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

First published: June 14, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading