Elec-widget

राहुल गांधींचा डाव नरेंद्र मोदींनी उलटवला ; 'मै भी चौकीदार हूँ'

राहुल गांधींचा डाव नरेंद्र मोदींनी उलटवला ; 'मै भी चौकीदार हूँ'

राहुल गांधी यांच्या चौकीदार ही चोर है या आरोपाला भाजपनं आता व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 16 मार्च : राफेल करारावरून सध्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. त्यात 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देत नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. देशभरात सभा घेत 'चौकीदार ही चोर है' असा घणाघाती आरोप राहुल गांधी नरेंद्र मोदींवर करताना दिसत आहेत. त्याला आता भाजपनं व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं असून 'मै भी चौकीदार हूँ' अशी टॅग लाईन वापरण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्विट मिळत आहेत.

या व्हिडीओमध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास आणि सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक भागातील नागरिकआणि त्यांच्या भावना 'मै भी चौकीदार हूँ' या व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा असा शेवट या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्यानं भाजपनं आता थेट व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चाय पे चर्चा नाही तर 'मै भी चौकीदार हूँ'

2014च्या निवडणुकीमध्ये 'चाय पे चर्चा' कार्यक्रमांचं आयोजन करत भाजपनं विरोधकांना आव्हान दिलं होत. त्यानंतर आता 'मै भी चौकीदार हूँ' म्हणत भाजपनं थेट विरोधकांना आव्हान दिलं आहे.


भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी?


2014 आणि मोदीमय देश

2014मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत भाजपनं 'अब की बार मोदी सरकार' म्हणत काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी सारख्या सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घातला होता. त्यावेळी त्यांनी देशभर प्रचार करत सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवलं होतं. शिवाय, 'हम मोदी जी को लाने वाले है, अच्छे दिन आने वाले है' यावर देखील व्हिडीओ बनवत तत्कालीन सरकारविरोधात जोरदार प्रचार करण्यात आला होता. याचा पूर्णपणे फायदा घेत मोदी लाटेत एनडीएनं देशात सत्ता स्थापन केली होती.

त्यानंतर 2019मध्ये देखील भाजपनं आक्रमकपणे रणनिती आखत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे.

VIDEO: निवडणुकीच्या तोंडावर मोठी रोकड जप्त


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...