भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन केलं आवाहन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन केलं आवाहन

ट्विटरवरुन त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : भाजप अध्यक्ष (BJP National President) जेपी नड्डा यांना कोरोनाची (J.P. Nadda Corona Possitive) लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत असल्याने मी तपासणी केली आणि तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे मी पालन करीत आहे. माझी प्रकृती ठीक आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत: आयसोलेट करावं व स्वत:ची चाचणी करुन घ्यावी.

गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय व्यक्तींपासून मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसात देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्वांनाच कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे.

कोरोनाची लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यूकेमध्ये कोरोना लशीचा आपात्कालीन वापर (Emergency Use Authorisation) सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (Serum Institute of India). सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी  ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी खूशखबर अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 6:12 PM IST

ताज्या बातम्या