... म्हणून भाजपच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधी यांचा बंगला

... म्हणून भाजपच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधी यांचा बंगला

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसनुसार प्रियंका गांधी 1 ऑगस्टनंतर या बंगल्यात राहू शकत नाहीत. दरम्यान, आता हा बंगला एका भाजप नेत्याला देण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली होती. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसनुसार प्रियंका गांधी 1 ऑगस्टनंतर या बंगल्यात राहू शकत नाहीत. दरम्यान, आता हा बंगला एका भाजप नेत्याला देण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यं प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांनी हा बंगला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

प्रियंका गांधी वड्रा यांनी बंगला रिकामा केल्यानंतर अनिल बलुनी यांना त्याचा ताबा घेता येणार आहे. दरम्यान अनिल बलुनी यांनी स्वत: या बंगल्याची मागणी केली होती. अनिल बलुनी यांनी आपल्या प्रकृतीसाठी या बंगल्याची मागणी केली होती, त्यानुसार केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून त्यांना हा बंगला देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांना बंगला सोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. या प्रणालीनुसार ज्यांना या प्रकारचं संरक्षण देण्यात येतं, त्यांना शासकीय निवास व्यवस्था दिली जात नाही. अशा परिस्थितीत प्रियंका गांधींना लवकरच बंगला रिकामा करावा लागू शकतो.

दुसरीकडे 30 जूनपर्यंत प्रियंका गांधी यांच्यावर 3,46,677 रुपयांची थकबाकी आहे. प्रियंका यांना थकित रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. प्रियंका गांधी वड्रा फेब्रुवारी 1997 पासून 35 लोधी इस्टेटमध्ये राहात आहेत.

गांधी कुटुंबाची काढली होती एसपीजी सुरक्षा

विशेष म्हणजे नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. गांधी कुटुंबाला अजूनही झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. सर्व संस्थांकडून मिळालेल्या धमकी आदींचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने केलेल्या आढाव्यानुसार गांधी कुटुंबाला कोणताही थेट धोका नसल्याचे समोर आले. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधानांनाही एसपीजी संरक्षण देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार कमी केला जातो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षादेखील ऑगस्ट 2019 मध्ये उठविण्यात आली होती.

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 6, 2020, 8:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading