Home /News /national /

भाजपच्या नेत्यानं घातलं गावजेवण; रस्त्यावरच 7 किलोमीटर लांबवर बसली 10 लाख लोकांची पंगत

भाजपच्या नेत्यानं घातलं गावजेवण; रस्त्यावरच 7 किलोमीटर लांबवर बसली 10 लाख लोकांची पंगत

गावात नव्हे, तर मोठ्या शहरात रस्ता जणू डायनिंग टेबल झाला. 1 लाख किलो कणीक आणि 2000 डबे साजूक तूप वापरून स्वयंपाक केला गेला. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी हा विश्वविक्रमी घाट घातला होता.

  इंदौर, 4 मार्च : छोट्या गावात काही आनंदाप्रित्यर्थ गावजेवण घालण्याची प्रथा अजूनही आहे. पण इंदौरसारख्या शहरात एका वेळी 10 लाख लोकांच्या पंगती रस्त्यात बसल्याचं ऐकून खरं वाटणार नाही. पण तब्बल 7 किमी रांगेत ही भलीथोरली पंगत बसली होती. 25000 लोक फक्त वाढण्याचं काम करत होते. हा एवढ्या पंगतीप्रपंचाचाच विश्वविक्रमच झाला आणि तो केला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय (Kailash vijayvargiya) यांनी. कैलास विजयवर्गीय नुसते आस्तिक नाहीत, तर श्रद्धाळू म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी पितरेश्वर हनुमान मंदिरात 9 दिवसाच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या समापनानिमित्त त्यांनी हे विश्वविक्रमी गावजेवण घातलं. वर्ल्ड बुक ऑफ रिकार्ड (World book of records)मध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या या भोजन समारंभासाठी 1000 हलवाई रांधत होते. 10 ठिकाणी स्वयंपाक सुरू होता. वाचा - WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी! अखेर तुमची काळजी घेणारं फीचर आलं, असा करा वापर 2000 महिलांसह एकूण 25000 जण फक्त वाढण्याचं काम करत होते. 10 लाख लोकांनी या पंगतीत भोजनाचा आस्वाद घेतला. 1 लाख किलो कणीक आणि 2000 डबे तूप 3 मार्चला झालेल्या या सोहळ्याचं वर्णन अनेकांनी मिनी कुंभ मेळा असं केलं आहे. संध्याकाळी 4 वाजता इंदौरच्या रस्त्यावर ही जेवणावळ सुरू झाली ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या प्रचंड जेवणावळीसाठी 2000 डबे साजूक तूप, 90 डबे तेल, 1000 क्विंटल कणीक (म्हणजे 1,00,000 किलो), 500 क्विंटल बेसन, 500 क्विंटल बटाटे, 500 क्विंटल मसाले, 500 क्विंटल भाजी आणि अन्य पदार्थ वापरले गेले. 20 वर्षांनी काल केलं अन्नग्रहण भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी शहरविकासासाठी 20 वर्षांपूर्वी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला होता. त्यांचा हा संकल्प 1 पूर्ण झाल्यानंतर 20 वर्षांनंतर त्यांनी 2 मार्चला अन्नग्रहण केलं. दुसऱ्याच दिवशी या अनुष्ठानसमाप्तीचा पंगतीप्रपंच केला. अन्य बातम्या

  भाजप नेत्यानं 20 वर्षांनी सेवन केलं अन्न, 'या' कारणासाठी केला होता संकल्प

  1000 रुपयाची नवी नोट बाजारात? जाणून घ्या काय आहे सत्य

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: BJP, Indore, Kailash vijayvargiya

  पुढील बातम्या