मराठी बातम्या /बातम्या /देश /

'संघाचे पदाधिकारी इथे आहेत म्हणून, नाहीतर शहर जाळलं असतं' - भाजप सरचिटणीसांचा तोल सुटला

'संघाचे पदाधिकारी इथे आहेत म्हणून, नाहीतर शहर जाळलं असतं' - भाजप सरचिटणीसांचा तोल सुटला

"इथे माझ्याबरोबर संघाचे पदाधिकारी आहेत म्हणून... नाहीतर शहर जाळलं असतं...", हे शब्द आहेत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचे. पाहा VIDEO

"इथे माझ्याबरोबर संघाचे पदाधिकारी आहेत म्हणून... नाहीतर शहर जाळलं असतं...", हे शब्द आहेत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचे. पाहा VIDEO

"इथे माझ्याबरोबर संघाचे पदाधिकारी आहेत म्हणून... नाहीतर शहर जाळलं असतं...", हे शब्द आहेत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचे. पाहा VIDEO

  • Published by:  Arundhati Ranade Joshi

इंदौर, 3 जानेवारी : कमिशनर भेटीसाठी वेळ देत नाही, म्हणून भाजप कार्यकर्ते धरणे धरून बसले होते. त्या वेळी तिथे आलेल्या भाजपच्या बड्या नेत्याने थेट शहर जाळण्याची धमकी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इंदौरमध्ये ही घटना घडली.

"अधिकारी आता इतके मोठे झाले का, की प्रोटोकॉल समजून घेत नाहीत. भेटायची वेळ मागितली तरी नाही म्हणतात, हे आता सहन करणार नाही. इथे माझ्याबरोबर संघाचे पदाधिकारी आहेत म्हणून... नाहीतर शहर जाळलं असतं...", हे शब्द आहेत कैलाश विजयवर्गीय यांचे. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. इंदौरमध्ये शहरात कमिशनर ऑफिसबाहेर भाजपने आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिल्यामुळे विजयवर्गीय चिडले, असं समजतं.

कैलास विजयवर्गीय यांचा तोल का सुटला?

मध्य प्रदेशात इंदौरच्या भाजप शहर अध्यक्षांकडून शहरविकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी चार अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आलं होतं. एका अधिकाऱ्याने स्वच्छता अभियानात व्यग्र असल्याचं कारण दिलं, तर अन्य दोघा अधिकाऱ्यांनी या पत्राचं उत्तरच दिलं नाही. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी भडकले. त्यांनी कमिशनर ऑफिससमोर आंदोलन सुरू केलं. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीयदेखील या आंदोलनात सामील झाले. आम्ही पत्र लिहूनही तुम्ही वेळ देत नाही, हे सहन केलं जाणार नाही, अशा शब्दात विजयवर्गीय तिथल्या अधिकाऱ्याशी वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माझ्याबरोबर इथे संघाचे पदाधिकारीही आहेत, नाहीतर इंदौर जाळलं असतं, अशा शब्दात विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला धमकावल्याचं दिसतं.

---------------------------------

अन्य बातम्या

काँग्रेसची वादग्रस्त पुस्तिका; सावरकरांच्या नातवाला भेटायचं उद्धव ठाकरेंनी टाळलं

असे आहेत ठाकरे सरकारचे संभाव्य पालकमंत्री

मंदिरातल्या पुजाऱ्यालाच लागले PUBGचे वेड, हौस पूर्ण करण्यासाठी उचललं भयंकर पाऊल

रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!

First published:

Tags: Indore, Kailash vijayvargiya