S M L

भाजपच्या 'VISION 2022' मध्ये राम मंदिराचा मुद्दा नाही

राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजन 2022 चं कौतुक करत राजकीय प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावात राम मंदिराचा मुद्दा घेण्यात आलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2018 04:05 PM IST

भाजपच्या 'VISION 2022' मध्ये राम मंदिराचा मुद्दा नाही

नवी दिल्ली, ता.9 सप्टेंबर : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार असून त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी बैठकीत आज राजकीय प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला कार्यकारिणीने एकमताने मंजूरी दिलीय. राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजन 2022 चं कौतुक करत राजकीय प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावात राम मंदिराचा मुद्दा घेण्यात आलेला नाही.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही हा मुद्दा प्रस्तावात नसल्याचं सांगितलं. राम मंदिराचा मुद्दा हा निवडणूकीचा मुद्दा नसून तो आस्थेचा मुद्दा असल्याचा भाजप नेहमी युक्तिवाद करत असतो. असं असलं तरी राम मंदिराचा मुद्दा का नाही असा प्रश्न आता विचारला जातोय.

पंतप्रधान मोदींनी व्हिजन 2022 मध्ये नव्या भारताचं जे स्वप्न मांडलं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असंही जावडेकर म्हणाले. विरोधकांकडे कुठलही व्हिजन नाही, नीती नाही आणि रणनितीही नाही.त्यांच्याकडे फक्त मोदी हटाओ हा एक कलमी कार्यक्रम आहे अशी टीकाही त्यांनी केली. भाजप 2019 मध्ये 2014 पेक्षाही जास्त जागा जिंकेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2018 04:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close