मुरली मनोहर जोशींचे अडवाणींना पत्र, काय आहे सत्य?

मुरली मनोहर जोशींचे अडवाणींना पत्र, काय आहे सत्य?

भाजपने दोन्ही जेष्ठ नेत्यांना 2019 च्या लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही. मुरली मनोहर जोशींनी याबाबत मतदारांनाही एक पत्र लिहले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लिहलेले एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लिहल्याचे म्हटले जाते. हे पत्र व्हायरल होण्याचे कारण आहे की, यात मुरली मनोहर जोशी यांनी पक्ष नेतृत्वावर दुर्लक्ष केल्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. घरातले लोका त्यांचा अपमान करत आहेत. घरातून म्हणजेच पक्षातून काढण्याचं काम सुरू आहे. या पत्रातील मजकूर पाहता ते व्हायरल होतणं साहजिक आहे. मात्र, हे पत्र खोटं असल्याचं समोर आलं आहे.

मुरली मनोहर जोशींच्या नावाचे पत्र एएनआय या वृत्तसंस्थेच्या लोगोसह व्हायरल झाले होते. त्यावर विश्वास ठेवून अनेकांनी ते सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, एएनआयने हे पत्र आपल्याकडून गेले नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे मुरली मनोहर जोशींनासुद्धा लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी कानपुर मतदारसंघातील मतदारांना याबद्दल माहिती देणारं पत्र लिहलं होतं. यामुळे त्यांच्या नाराजीबद्दल अडवाणींना लिहलेलं पत्र व्हायरल झालं आणि लोकांना ते खरं वाटू लागलं.

पत्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाबद्दल भाजपच्या कामगिरीबद्दल लिहण्यात आलं होतं. मात्र पत्रात अनेक ठिकाणी चुका असल्याने याबाबत शंका व्यक्त केली जात होती. शेवटी शनिवारी मुरली मनोहर जोशींनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र लिहले नसल्याचे स्पष्ट केले. या पत्रामागे कोण आहे हे मात्र अजून समजलं नाही.

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

First published: April 15, 2019, 12:04 PM IST

ताज्या बातम्या