नुसरत जहाँच्या विवाहाचा वाद पोहोचला संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे भाजप खासदाराने केली कारवाईची मागणी

भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत जहाँ (Nusarat Jahan) यांचं लोकसभा सदस्यत्व (Loksabha MP) रद्द करण्याची मागणी केली आहे. 'नुसरत यांचं वर्तन योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं.

भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत जहाँ (Nusarat Jahan) यांचं लोकसभा सदस्यत्व (Loksabha MP) रद्द करण्याची मागणी केली आहे. 'नुसरत यांचं वर्तन योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं.

  • Share this:
नवी दिल्ली 22 जून: लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या विवाहाचा मुद्दा आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेशातल्या बदायूँ मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत जहाँ (Nusarat Jahan) यांचं लोकसभा सदस्यत्व (Loksabha MP) रद्द करण्याची मागणी केली आहे. 'नुसरत यांचं वर्तन योग्य नाही. विवाहाच्या मुद्द्यावरून त्यांनी मतदारांना अंधारात ठेवलं आहे,' असं संघमित्रा मौर्य  (Sanghmitra Mourya)  यांनी पत्रात लिहिलं आहे. 'नुसरत यांनी लोकसभेच्या सदस्या म्हणून शपथ घेताना आपलं नाव नुसरत जहाँ रुही जैन असं उच्चारलं होतं. लोकसभेच्या वेबसाइटवर नुसरत जहाँ यांच्या पतीचं नाव निखिल जैन असं लिहिलेलं आहे. नुसरत यांनी संसदेच्या वैभवशाली परंपरेला बट्टा लावला आहे. हे प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवण्याची गरज आहे,' अशी मागणी संघमित्रा मौर्य (Sanghmitra Mourya) यांनी पत्रात केली आहे. नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही मौर्य यांनी केली आहे. संसदेतल्या पहिल्या दिवशी नुसरत यांचं नव्या नवरीसारखं नटून येणं, ममता बॅनर्जी यांचं रिसेप्शनमध्ये सहभागी होणं आदी बाबींचा उल्लेखही आपल्या पत्रात मौर्य यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार 'यांना गाडीत टाका, शिवबंधन बांधूया' 'निखिल जैन यांच्याबरोबर झालेला आपला विवाह तुर्कीमधल्या कायद्यानुसार झाला होता. या विवाहाला भारतीय कायद्यानुसार मान्यता मिळालेली नाही,' असा खुलासा नुकताच नुसरत जहाँ यांनी केला होता. त्यामुळे निखिल जैन (Nikhil Jain) यांच्याबरोबर आपण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो, असं नुसरत यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत अनेकदा उभे राहिलेले अभिनेते यश दासगुप्ता (Yash Dasgupta) यांच्यासोबत नुसरत जहाँ सध्या डेटिंग करत असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमी संघमित्रा मौर्य यांनी ओम बिर्ला (Om Birla) यांना हे पत्र लिहिलं आहे. नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह 2019मध्ये तुर्कीत झाला होता. त्यांचा विवाह आंतरधर्मीय आहे. त्यामुळे त्याला भारतात विशेष विवाह अधिनियमानुसार मान्यता मिळण्याची गरज आहे. ती मान्यता अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, निखिल जैन यांनी नुकतंच सांगितलं, की त्यांना नुसरत यांना तलाक द्यायचा आहे; मात्र त्यावर नुसरत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, 'भारतीय कायद्यानुसार आमच्या विवाहाला मान्यताच मिळालेली नसल्याने तलाकचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो होतो; मात्र मला माझं खासगी जीवन खासगीच ठेवायचं असल्याने मी याबद्दल सार्वजनिकरीत्या काही भाष्य केलं नाही. त्यामुळे विभक्त होण्याबद्दल माध्यमं किंवा अन्य कोणीही माझ्यावर सवाल उपस्थित करू नयेत. कारण या विवाहाला भारतीय कायद्यानुसार मान्यताच मिळालेली नव्हती.' मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर दरम्यान, आपण वेगळे राहत असून, गर्भवती असल्याचंही नुसरत यांनी अलीकडेच जाहीर केलं होतं. पश्चिम बंगालच्या (West Bengal) बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर नुसरत जहाँ 2019मध्ये निवडून आल्या. त्याच वर्षी झालेल्या त्यांच्या विवाहसोहळ्यात तुर्की येथे निवडक लोक उपस्थित होते. लोकसभा निवडणूक जिंकल्यावर नुसरत यांनी कोलकात्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यात ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Published by:Kiran Pharate
First published: