भाजपच्या खासदारांनी मुस्लीम तरुणाला दिली गळा कापण्याची धमकी

भाजपच्या खासदारांनी एका मुस्लीम तरुणाला त्याचा गळा कापण्याची धमकी दिली. हा तरुण आदिवासी महिलांवर अत्याचार करतो, असा त्यांचा आरोप आहे. या खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 03:37 PM IST

भाजपच्या खासदारांनी मुस्लीम तरुणाला दिली गळा कापण्याची धमकी

आदिलाबाद (तेलंगणा) : भाजपच्या एका खासदारांनी मुस्लीम तरुणाला धमक्या देण्याची घटना घडली आहे. त्यांनी दिलेली ही धमकी अतिशय गंभीर आहे. मुस्लीम तरुणाचा गळाच कापला जाईल, असं हे सोयम बापू राव नावाचे भाजपचे खासदार म्हणाले.

हा मुस्लीम तरुण आदिवासी महिलांवर अत्याचार करतो, असा त्यांचा आरोप आहे. सोयम बापू तेलंगणाच्या आदिलाबादचे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात या धमकी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष साजिद खान यांनी सोयम बापूंच्या विरोधात तक्रार दाखल केली.

वक्तव्य मागे घेण्याची मागणी

सोयम बापू यांनी केलेलं वक्तव्य मागे घ्यावं, असं साजिद खान यांनी म्हटलं आहे. खासदार असूनही सोयम बापू यांनी अल्पसंख्याकांच्या विरोधात चुकीचे आरोप केलेय त्यामुळेच त्यांनी आपलं म्हणणं लगेच मागे घ्यावं, असं ते म्हणाले.

यावर्षीच भाजपत प्रवेश

Loading...

सोयम बापू राव यांनी याच वर्षी मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी 2004 मध्ये ते तेलंगणा राष्ट्र समितीच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी काँग्रेसकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. पण काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते आदिलाबादमधून खासदार म्हणून निवडून आले.

भाजपचा उलटा आरोप

भाजपच्या या खासदारांवर त्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका होते आहे. पण सत्ताधारी भाजपच्या खासदारांना जाणुनबुजून लक्ष्य केलं जात आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अशा प्रकारची धमकी देणं ही आक्षेपार्ह गोष्ट आहे, असा सूर व्यक्त होतो आहे.

===================================================================================

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...