लखनऊ, 18 डिसेंबर : UP तील कैसरगंजमधून BJP खासदार (BJP MP) आणि भारतीय कुस्ती संघाचे (Indian Wrestling Association) (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी तरुण कुस्तीपटूला (Wrestler) कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा वाद सुरू झाला आहे. रांची येथील एका गावात आयोजित केलेल्या मेगा स्पोर्ट्स स्टेडियममधील या घटनेवरुन आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सध्या रांचीमध्ये तीन दिवशीय अंडर-15 नॅशनल कुस्ती चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे बृजभूषण मुख्य पाहुणे म्हणून स्टेजवर होते. दरम्यान एक कुस्तीपटू डिस्क्वालिफाय झाला म्हणून खासदारांकडे मदतीने मागणी करू लागला. सुरुवातील खासदारांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून त्याच्या कानशिलात लगावली.
यानंतर कुस्तीपटूला तेथून हटवण्यात आलं. ही घटना तीन दिवसांपूर्वी बुधवारी घडली. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर मात्र विरोधकांनी भाजप खासदाराला धारेवर धरलं आहे. बृजभूषण सिंह सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. ते भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्षदेखील आहेत. तरुणपणात तेदेखील कुस्ती करीत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा-...तर मुली अश्लील व्हिडीओ पाहतील, सपा नेत्याची जीभ घसरली
कुस्तीपटूचं वय अंडर-15 साठी जास्त होतं...
कुस्ती संघांच्या विश्वस्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियनशिपमध्ये विविध राज्यातून 800 हून अधिक कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशातून एक कुस्तीपटू आला होता. मात्र तो 15 वर्षांहून मोठा होता. त्यामुळे त्याला स्पर्धेत सहभागी होऊ देण्यास नकार देण्यात आला होता. दरम्यान तो यात वाद घालू लागला. स्पर्धेच्या व्यवस्थापकांसोबत बराच वेळ वाद घालूनही त्याने कोणाचंही ऐकलं नाही. तो थेट भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याजवळ गेला. यादरम्यान रागाच्या भरात खासदाराने त्याच्या कानशिलात लगावली.
#WATCH | Brij Bhushan Sharan Singh, BJP MP from Uttar Pradesh, slaps young #wrestler on stage in Ranchi. The video has gone viral. #Ranchi #brijbhushansharansingh pic.twitter.com/muD8sdaqsO
— Subodh Kumar (@kumarsubodh_) December 18, 2021
या घटनेनंतर RJD ने त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना टॅग करून लिहिलं की, - 'या राम राज्याबद्दल बोलतात चिलम छाप ढोंगी. माफिया डॉन भाजप खासदार बृजभूषण यांनी विनाकारण एका कुस्तीपटूला स्टेजवरच कानशिलात लगावली. हेच आहे राम राज्य!'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Uttar pradesh, Video viral