मराठी बातम्या /बातम्या /देश /

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे जशास तसे, BJP खासदाराच्या पत्नीने केला TMCमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे जशास तसे, BJP खासदाराच्या पत्नीने केला TMCमध्ये प्रवेश

भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.

भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.

भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.

  • Published by:  Ajay Kautikwar
कोलकता 21 डिसेंबर: पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी वातावरण चांगलच तापलं आहे. (West Bengal Assembly Election 2021) गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तृणमूलला गळती लागलेली असतानाच आता भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल (Sujata Mandal) तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात माजी मंत्री आणि ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सौमित्र खान हे भाजपच्या युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. भाजप हा आता फक्त संधीसाधूंचा पक्ष बनला असून निष्ठवान नेत्यांचा काहीही सन्मान राहिलेला नाही. एक महिला असल्याने भाजपमध्ये काम करणे यापुढे शक्य नसल्याचं सुजाता मंडल यांनी म्हटलं आहे. अमित शहा (Amit shah) यांनी दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यात (West bengal) म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. भाजप (BJP) याठिकाणी बहुमतानं निवडून येईल आणि ममता बॅनर्जीला ऐतिहासिक पराभवाला सामोरं जावं लागेल. काँग्रेसला आणखी एक धक्का; वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा यांचं निधन मात्र तृणमूल कॉंग्रेसचे (Trinamool congress) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपच्या या वक्तव्याला काल्पनिक म्हटलं आहे. तसेच भाजपनं जर या निवडणूकीत दुहेरी आकडा पार केला तर मी ट्विटर (Twitter) सोडेल, असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे. प्रशांत किशोर यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, प्रसारमाध्यमांचा एक गट भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहे, यावरून लक्षात येतं की भाजप दुहेरी आकड्यासाठी संघर्ष करीत आहे. भाजपनं जर बंगालमध्ये चांगली कामगिरी केली, तर मी ट्विटर सोडेल.
First published:

Tags: TMC

पुढील बातम्या