नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संभाजीराजे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. संभाजीराजे आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवादही साधला आहे. तीन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर आता संभाजीराजे हे संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
भेटीनंतर खासदार संभाजीराजे म्हणाले...
दरवर्षी न चुकता शरद पवारसाहेबांना आणि मला संजय राऊत हे जेवायला सुद्धा बोलवतात. आज माझी इच्छा झाली की, सकाळी येऊन त्यांच्यासोबत चहा प्यावा. येऊ नये का? दिल्लीतील हिच वैशिष्ट्ये आहेत की, खासदार एकमेकांशी बोलू शकतात.
वाचा : Aurangabad: शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर जमा झाले 15 लाख अन् बांधलं स्वप्नातलं घर आणि मग...
तीन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले - अजित पवार भेट
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी (5 फेब्रुवारी) खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तसेच उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो.
काय घडलं बैठकीत?
उपुमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रासारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
डिसेंबर महिन्यात उदयनराजे भोसलेंनी घेतली होती शरद पवारांची भेट
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली होती.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार दिल्लीत होते. याच दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली. नुकत्याच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली होती त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.