मंडी, 17 मार्च: हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) मंडी याठिकाणाहून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. मंडीमधून भाजपचे खासदार असणारे रामस्वरुप शर्मा (Ramswaroop Sharma) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. प्राथमिक माहितीनुसार शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शर्मा सध्या दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Election 2019) मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशातील एक हॉट सीट असणाऱ्या जागेवर त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेस उमेदवार आश्रय शर्मा यांनी जवळपास 4 लाख मतांनी हरवले होते. आतापर्यंत मंडीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय मानला जातो. भाजप खासदाराच्या मृत्यूनंतर आता संसदीय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.
BJP MP from Mandi, Ram Swaroop Sharma died allegedly by suicide in Delhi. Police received a call from a staffer. He was found hanging and the door was closed from inside: Delhi Police
Visuals from Gomti Apartments where he was found dead. pic.twitter.com/OVOs1NP5W2 — ANI (@ANI) March 17, 2021
दरम्यान घटनास्थळावरून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. पोलिसांच्या माहितीनुसार याठिकाणी असणाऱ्या स्टाफने सकाळी 7 च्या सुमारास पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. सुरुवातीला त्यांची खोली आतून बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस गेट तोडून आतमध्ये शिरले. गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह गोमती अपार्टमेंटमध्ये सापडला. त्यांना खाली उतरवून रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना शर्मा यांचा मृत्यू झाला.
(हे वाचा-Coronavirus : क्रिकेटला पुन्हा फटका, मोठी स्पर्धा स्थगित करण्याचा BCCI चा निर्णय)
हे खासदार दिल्लीत गोमती अपार्टमेंटमध्ये राहत होते आणि हे अपार्टमेंट आरएमएल रुग्णालयासमोर आहे. फॉरेन्सिक तपास करणारी पोलिसांची टीम तपासानंतर घटनास्थळावरून निघून गेली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अशी माहिती मिळते आहे की, शर्मा यांना रोज सकाळी 6.30 पर्यंत जाग येत असे. आज सकाळी ते 6.30प र्यंत तो उठलेच नाहीत, तेव्हा त्यांच्या पीएने कंट्रोल रूमला कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी येऊन दार तोडले. त्यावेळी कुक पीए घरात उपस्थित होते आणि कुटुंबातील उर्वरित सदस्य त्यांच्या गावी राहतात. अशीही माहिती समोर आली आहे की, 62 वर्षीय खासदार बर्याच दिवसांपासून आजारी होते. घटनास्थळी घरी बरीच औषधे देखील सापडली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Election, Himachal pradesh, Loksabha