'बच्चे तो ऊपरवाले की देन हैं' लोकांना ही मानसिकता सोडावीच लागेल'

'लोकसंख्या नियंत्रणाच्या धोऱणाला धार्मिक रंग दिला जाऊ नये. नवा कायदा हा सर्व देशवासियांसाठी सारखाच असला पाहिजे.'

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 03:04 PM IST

'बच्चे तो ऊपरवाले की देन हैं' लोकांना ही मानसिकता सोडावीच लागेल'

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणात लोकसंख्या नियंत्रण हा महत्त्वाचा मुद्दा होता. गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा मांडला होत. त्यावर आता देशभर चर्चा सुरू झालीय. भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी या मुद्यावर परखड मत व्यक्त केलंय. लोकसंख्या नियंत्रणाला धार्मिक रंग देऊ नये. हा देशासमोरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार लोकसंख्या वाढीविरुद्ध लवकरच नवा कायदा आणणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

काश्मीरप्रश्नी चीन-पाकची मागणी UNSCनं ऐकली, आज 'बंद खोलीत' होणार बैठक

सिन्हा म्हणाले, मुस्लिम समाजाची संख्या प्रचंड झपाट्याने वाढतेय. 'बच्चे तो ऊपरवाले की देन हैं' अशी काही लोकांची मानसकिता आहे. ही मानसिकता बदलण्याची गरच आहे. जेव्हा तुमचा परिवार छोटा असेल तेवढी लोकसख्या कमी होईल आणि पायाभूत सुविधांवरही ताण कमी पडेल. छोटं कुटुंब ठेवणं हेही देशभक्तीचं काम आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ

या मुद्याला धार्मिक रंग दिला जाऊ नये. नवा कायदा हा सर्व देशवासियांसाठी सारखाच असला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. देशाची सध्याची लोकसंख्या ही 130 कोटींपेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं. जगात चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. लोकसख्या वाढीला वेग असचा राहिला तर भारत चीनलाही मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Loading...

लोकसंख्येचं प्रमाण आणि त्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा याचं भारतातलं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. सरकारने कितीही उपाययोजना केल्या तरी त्या काही वर्षात कमीच पडतात त्यामुळे लोकसंख्या नियंत्रशीवाय पर्याय नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...