मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा हाजीर हो; NIA कोर्टाचे आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा हाजीर हो; NIA कोर्टाचे आदेश

Special NIA court directs Pragya Singh Thakur : आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जून : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना आता NIA न्यायालयानं आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले आहे. साध्वी प्रज्ञा या भोपाळमधील भाजप खासदार आहेत. 2008मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. सध्या साध्वी प्रज्ञा या जामिनावर बाहेर आहेत.

यापूर्वी देखील NIA न्यायालयानं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान अनेकवेळा आरोपी गैरहजर राहत असल्यानं न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली होती. जामिनावर असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना भाजपनं उमेदवारी देत भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात मैदानात उतरवलं होतं. त्यांनी भोपाळमधून विजय मिळवला आहे.

‘मुंडे साहेब हाती काहीच उरत नाही’; पंकजांचं भावनिक ट्वीट

साध्वी आणि वाद

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. तर, नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या साध्वींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रागाचा सामना करावा लागला. साध्वीला मनातून कधी माफ करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं होतं. निकालानंतर संसदेच्या सेंट्रल हॉल सोहळ्यात भाजपच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना नरेंद्र मोदींनी टाळल्याचं दिसून आलं होतं.

न्यायालयानं फेटाळली होती याचिका

यापूर्वी साध्वी प्रज्ञा यांना निवडणूक लढवण्यापासून रोखावं याकरता NIA कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली होती.

SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद

First published: June 3, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या