नवी दिल्ली,7 फेब्रुवारी: देशात वायु प्रदुषणाची समस्यात सतत वाढ होत आहे. यामुळे देशात पर्यावरण समतोल राखणे कठीण झाले आहे. केंद्र शासनाने राबविलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम अंतर्गत मुंबई तसेच राजधानी दिल्ली शहरांसाठी याबाबत किती सहायता निधी आंवटित केला असल्याचे प्रश्न, मुंबई ईशान्यचे खासदार मनोट कोटक यांनी शुक्रवारी लोकसभेत उपस्थित केला.
बजेट सत्राच्या अधिवेशनात, खासदार कोटक यांनी केंद्रीय पर्यावरण, वन तथा जलवायु परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर यांना वायु प्रदुषणामुळे मुंबई, दिल्ली तसेच विविध महानगरांमधील जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यासंदर्भात कोटक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. खासदार कोटक यांनी वायु प्रदूषण स्तर कमी होण्यासाठी राष्ट्रीय वायु कार्यक्रम राबविले आहे किंवा कसे असे विचारत, त्यांनी यासंबंधी अद्यावत माहिती विचारली.
खासदार मनोट कोटक यांनी विचारले की, सदर कार्यक्रम जर राबविण्यात आला असेल, तर या अंतर्गत मुंबई तसेच दिल्ली सारख्या विविध महानगरामध्ये जलवायुमध्ये याचा समग्र प्रभाव कसा आहे, आणि यासोबतच मुंबई, दिल्ली तसेच विविध महानगना किती सहायता निधी आवंटित झाले असल्याचीही माहिती त्यांनी लोकसभेत विचारली. सोबतच खासदार कोटक यांनी ई-वाहनांच्या संदर्भात पुरवणी प्रश्नही उपस्थित केला. मुंबई तसेच दिल्ली महानगरांमध्ये जलवायुचा स्तर पाहता, ई-वाहनांचा अधिका-अधिक वापर होणे आवश्यक आहे. यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासरणार असून, प्रभावी वायु गुणवत्ता व्यवस्थापनात, अंमलबजावणी यंत्रणा किंवा ठोस देखरेख क्षमता वाढीसाठी काय पाऊले उचलली गेली आहेत, असा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai pollution