कमळाला 'हात' दाखवत सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशमध्ये आता काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजप खासदारानं आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 10:50 PM IST

कमळाला 'हात' दाखवत सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लखनऊ, 2 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे. सावित्रीबाई फुले या बहराइचमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या होत्या. पण, त्यांनी भाजपची साथ सोडल्यानं निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का आहे.

शिवाय, फतेहपूरमधील समाजवादी पक्षाचे माजी खासदार यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सक्रीय राजकारणात सहभागी झाल्यानंतर प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी भाजपला दोन मोठे धक्के दिले आहेत.

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'पाॅवर' घटली?

महाराष्ट्राच्या नेत्याचा उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का

यापूर्वी भाजप आमदार अवतारसिंह भडाना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी घरवापसी होणार असल्याची सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चा आहे. भडाना यांच्या काँग्रेस प्रवेशामागे महाराष्ट्रातील माजी खासदार नाना पटोले यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. काँग्रेसमध्ये येण्याकरता भडाना यांचं मन वळवण्यासाठी नाना पटोले यांनी यशस्वी प्रयत्न केले. शिवाय, राहुल गांधी यांच्या समोर देखील अवतार सिंह भडाना यांची बाजू मांडली. दरम्यान, अवतार सिंह भडाना फरीदाबादमधून लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Loading...

यापूर्वी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करत काँग्रेसमध्ये घर वापसी केली होती.

राहुल यांचा मास्टरस्ट्रोक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकीय प्रवेशामुळे राहुल गांधी यांनी मास्टरस्ट्रोक खेळल्याचं राजकीय निरिक्षकांचं मत आहे. पण, प्रियांका यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला किती फायदा झाला याकरता निकालांची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील 41 तर, ज्योतिरादित्य यांच्या खांद्यावर 39 मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. प्रियांका गांधी देखील कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधत आहेत.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...