'GDP म्हणजे बायबल-रामायण नाही', भाजपच्या या खासदारांची मुक्ताफळं

'GDP म्हणजे बायबल-रामायण नाही', भाजपच्या या खासदारांची मुक्ताफळं

GDP म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न सगळे विचारत असतात. त्यावर आता या खासदार महोदयांनी कडी केली आहे. त्यांच्या विधानाने त्यांनी भाजपला चांगलंच अडचणीत आणलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : देशाचा GDP म्हणजेच आर्थिक विकास दर 4.5 टक्क्यांवर आल्यामुळे सध्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंतेचं वातावरण आहे. यावर सरकारला उद्योगपती आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतायत. त्यातच आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी यावरून मुक्ताफळं उधळली आहेत.

GDP म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न सगळे विचारत असतात. त्यावर आता या खासदार महोदयांनी कडी केली आहे. त्यांच्या विधानाने त्यांनी भाजपला चांगलंच अडचणीत आणलंय.

'भविष्यात फारसा उपयोग नाही'

ते संसदेत म्हणाले, GDP ही संकल्पना 1934 मध्ये आली. याआधी GDP नव्हताच. त्यामुळे GDP म्हणजेच आर्थिक विकास दर हे काही बायबल, रामायण, महाभारत नाही. भविष्यातही GDP चा फारसा उपयोग होणार नाही, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. सामान्य माणसाचं सतत आर्थिक कल्याण होतं की नाही हे महत्त्वाचं आहे. GDP पेक्षाही विकास महत्त्वाचा आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

आता आर्थिक विकास दरापेक्षा विकास महत्त्वाचा कसा हे एक कोडंच आहे.

(हेही वाचा : राहुल बजाज यांच्या वक्तव्याला त्यांच्या मुलानेच घेतला आक्षेप, म्हणाले...)

अर्थमंत्र्यांवर टीका

मोदी सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडलेली नाही. उत्पादन क्षेत्रात आलेली घट आणि वैयक्तिक गुंतवणूक कमी झाल्यामुळे आर्थिक विकास दर 4.5 टक्के इतका खालावला आहे. गेल्या 6 वर्षांतला हा नीचांकी आकडा आहे. एकीकडे भाजपचे खासदार अशी वक्तव्यं करतायत तर दुसरीकडे काँग्रेसचे अधीररंजन चौधरींनीही पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आर्थिक मंदीवर टीका करताना त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख 'निर्बला सीतारामन' असा केला. आर्थिक विकास दर आणि रोजगारीचं प्रमाण कसं वाढवायचं यावर प्रयत्न करण्याची गरज असताना राजकीय नेते मात्र अशी बेजबाबदार वक्तव्यं करत सुटले आहेत, अशी टीका होतेय.

==============================================================================================

First published: December 2, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading