'शुद्रांना शुद्र म्हटलं तर त्यांना राग का येतो' साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान

'शुद्रांना शुद्र म्हटलं तर त्यांना राग का येतो' साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणलं पाहिजे, असं विधानही साध्वी प्रज्ञा यांनी केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजपच्या (BJP) खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi pradnya) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी मध्य प्रदेश (Madhyapradesh) मधील सीहोर येथील एका कार्यक्रमात त्यांनी जातीव्यवस्थेबाबत (Caste System) एक वादग्रस्त विधान (Controversy Statement) केलं आहे. तसंच पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांनाही लक्ष्य केलं.

भोपाळ येथून निवडून आलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यावेळी म्हणाल्या, की "क्षत्रियांना क्षत्रिय बोललं, तर त्यांना राग येत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं तर, त्यांना वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर त्यांनाही वाईट वाटत नाही. पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना राग येतो, याचं कारण काय आहे? कारण त्यांना समजत नाही." त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लासंबंधीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "बंगालमधील ममताचे शासन आता संपुष्टात येत आहे, हे त्यांना समजलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढा आगफाखड केला आहे." या विधानसभा निवडणूकीत फक्त भाजपच विजयी होईल आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज्य अस्तित्वात येईल, असंही त्या म्हणाल्या.

‘राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे’

राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणलं पाहिजे, असं विधानही साध्वी प्रज्ञा यांनी केलं. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळं त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचं रक्षण कोण करणार, असंही साध्वी प्रज्ञा या कार्यक्रमात म्हणाल्या

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 2:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या