Home /News /national /

भाजप आमदाराचा सिकंदर नावाचा अजगर झाला बेपत्ता; Happy hunting च्या दिल्या शुभेच्छा

भाजप आमदाराचा सिकंदर नावाचा अजगर झाला बेपत्ता; Happy hunting च्या दिल्या शुभेच्छा

' तो आमच्या घरात फिरत असतो. कधी तो माझ्या बाजूला बसतो तर कधी माझ्या खुर्चीवर बसलेला असतो. अनेकदा तो घराच्या गेटवर थांबून घराची राखणदेखील करतो. अनेकदा तो रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो.'

    दिसपूर, 1 ऑक्टोबर : आसाममधील भाजप आमदार मृणाल सैकिया यांनी आपल्या अजगराला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप आमदारांनी हा अजगर पाळला असून "happy hunting" असं म्हटलं आहे. मृणाल यांनी आपल्या घरात हा पायथॉन जातीचा अजगर पाळला असून मागील काही दिवसांपासून त्यांचा अजगर गायब झाला आहे. त्यामुळं त्यांनी ट्विट करत अजगराला शिकारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या भाजप आमदारांच्या घरात अजगाराबरोबरच विविध पाळीव प्राणीदेखील आहेत. एका मच्छिमाराला हा 10 फूट लांबीचा अजगर 18 महिन्यांपूर्वी आढळला होता. त्यानंतर या व्यक्तीने हा अजगर भाजप आमदारांच्या घरी आणला. त्यानंतर सैकिया यांनी या अजगराला सिकंदर असं नाव दिलं होतं. सैकिया यांनी आपल्या घरात विविध जंगली प्राणी पाळले असल्याने हा अजगरदेखील त्यांनी ठेवून घेतला आहे. मात्र मागील 3 दिवसांपासून हा अजगर गायब झाला आहे. त्यामुळे तो शिकारीसाठी बाहेर पडला असेल असे समजून त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या अजगाराविषयी सांगताना आमदार सैकिया म्हणाले,' तो आमच्या घरात फिरत असतो. कधी तो माझ्या बाजूला बसतो तर कधी माझ्या खुर्चीवर बसलेला असतो. अनेकदा तो घराच्या गेटवर थांबून घराची राखणदेखील करतो. अनेकदा तो रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो.' मागील 3 दिवसांपासून तो आम्हाला दिसलेला नाही. सैकिया अनेकदा आपल्या घरातील प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. या अजगराचे देखील फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत. हा अजगर कुणालाही चावत नसल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दिवसातून अनेकवेळा तो झाडावरच झोपलेला असतो. या पायथॉनबरोबरच आमदारांच्या घरात टर्की, ब्लॅक हॅन्स आणि ससेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. हे ही वाचा-आता वाढलं Ideal Weight and Height; पाहा तुम्ही त्यात फिट होताय की नाही नुकत्याच आसाममध्ये आलेल्या पुरामध्ये मृणाल यांनी मतदारसंघातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्याचबरोबर पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणीदेखील त्यांनी केली होती. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना जेवण  आणि निवाऱ्याची व्यवस्थादेखील या आमदारांनी केली होती. त्याचबरोबर पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मतदारसंघात मोबाइल किचन सर्व्हिसदेखील सुरु केली होती. यामधून नागरिकांना अन्न पोहोचवलं जात होतं. गोलाघाट या आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात बोट आणि इतर वाहनांच्या मदतीने नागरिकांना मदत करत बचाव कार्य केलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Python snake

    पुढील बातम्या