राजस्थान, 12 जुलै : उदयपुर सराडामधील एका भाजप आमदाराने बनावट मार्कशीट (Fake marksheet) दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभं केल्याच्या प्रकार समोर आला होता. या आरोपाखाली भाजप नेत्याची (BJP leader) तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरमधील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीचा अर्ज भरला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आमदाराचा जामीन अर्ज फेटाळला असून कोर्टाने तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस त्यांना तुरुंगात घेऊन गेले.
आमदार अमृतलाल मीणा यांना कोर्टाने तीन आठवड्यांपूर्वी सरेंडर करण्यास सांगितलं होतं. मीणा यांनी शनिवारी आरोग्याचं कारण देत कोर्टाकडून वेळ मागितली आणि आज ते कोर्टासमोर हजर झाले. येथे सुनावणीदरम्यान कोर्टाने अमृत लाल मीणा यांची जामीन याचिका फेटाळली आणि त्यांना तुरुंगात पाठवलं. सध्या त्यांना सलूंम्बर येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
हे ही वाचा-नरेंद्र मोदींपासून बायडन आणि किम जोंगपर्यंत हे नेते आहेत खाण्याचे शौकीन,
मीणा यांच्या पत्नीचं नाव शांतादेवी असून त्या सेमारीच्या सरपंच आहेत. त्या पाचवी पास असल्याचं बनावट मार्कशीट दाखवून पंचायतीची निवडणूक लढल्या होत्या, असा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणात आमदार अमृतलाल मीणा यांना आरोपी ठरविण्यात आलं होतं. यानंतर शांता देवी यांच्या मार्कशीटचा तपास करण्यात आला, ज्यात ते प्रमाणपत्र बनावटी असल्याचं दिसून आलं. या मार्कशीटवर अभिभावक म्हणून शांता देवीचे पती आमदार अमृतलाल मीणा यांचे हस्ताक्षर आहे. ज्याच्या आधारावर त्यांना आरोपी बनविण्यात आलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.