Home /News /national /

डोळ्यात अश्रू आणणारी गोष्ट! पहिली बायकोनं सोडली साथ, महिन्याभरानंतर भाजप आमदाराचा मृत्यू

डोळ्यात अश्रू आणणारी गोष्ट! पहिली बायकोनं सोडली साथ, महिन्याभरानंतर भाजप आमदाराचा मृत्यू

महिन्याभरापूर्वी पत्नीचं निधन झाल्यानंतर काही दिवसांत आमदार सुरेंद्र सिंह जीना यांना कोरोनाची लागण झाली. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : भाजप आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट या मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने त्यांची साथ सोडली होती. महिन्याभरापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार आमदार सुरेंद्र सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत होती. गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अचानक जाण्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा झटका बसला असून त्यांची पोकळी कधीही भरून न निघाणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. हे वाचा-नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपदी लादणे हा लोकमताचा अवमान, सेनेचं टीकास्त्र सुरेंद्र सिंह जीना हे उत्तराखंड भाजपाचा एक अनुभवी युवा चेहरा मानला जात होते. आतापर्यंत ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालवल्यानं त्यांचं गुरुवारी निधन झालं. 2006 मध्ये जीना कुमाऊं मंडळ विकास निगमच्या अध्यक्ष होते. 2007 मध्ये पहिल्यांदाच भिक्क्यासैंण या जागेवरून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. 2012 रोजी पुन्हा सल्ट या विभागातून आमदार म्हणून निवडून आले. 2017मध्ये पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला होता. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा कोरोनामुळे निधन झालं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP, Coronavirus, Coronavirus symptoms, Uttarakhand

    पुढील बातम्या