News18 Lokmat

VIDEO भाजप आमदाराचं सपना चौधरीबद्दल बेताल वक्तव्य

भाजप आमदाराची हीच संस्कृती आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 03:20 PM IST

VIDEO भाजप आमदाराचं सपना चौधरीबद्दल बेताल वक्तव्य

नवी दिल्ली 24 मार्च : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी सपना चौधरीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. राहुल गांधी यांनी सपनाला अपना करावं आणि राजकाणाची नवी सुरुवात करावी असं बेताल वक्तव्य सिंग यांनी केलंय.

सिंग हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर अशी अनेक मुक्ताफळंही त्यांनी उधळली. सोनिया गांधी या इटलीत आधी सपनासारखच काम करायच्या. राजीव गांधी यांनी त्यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे आता राहुल गांधी यांनीही सपनाची लग्न करावं असंही त्यांनी सूचीत केलं.नृत्यांगणांमुळे हा देश विकास करणार नाही तर मोदींसारख्या नेत्यांमुळेच देश प्रगतीपथावर जाणार आहे असंही ते म्हणाले. सपना चौधरी या मथुरेमधून लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. 'हरियाणा की शान' सपना चौधरीच्या डान्सचा जलवा सुरू झाल्यावर पब्लिक बेफाम होत असते. सपना चौधरीची लोकप्रियता देशभरात पसरली आहे. यू ट्यूबवर सपना यांच्या गाण्यांना लाखांच्या हिट्स आहेत. बिग बॉसमध्येही सपना सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.

Loading...

सुरेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही सिंग यांना लोकांनी ट्रोल केलंय. तुम्ही आमदार आहात बोलतांना सांभाळून बोला असा सल्ला लोकांनी सिंग यांना दिलाय. तर भाजप आमदाराची हीच संस्कृती आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...