हा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

हा देश हिंदूंचा, मुस्लिमांसाठी पाकिस्तान,भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

हा देश हिंदूंचाच असून मुस्लिमांनी आपल्यासाठी पाकिस्तान तयार केलाय असं वादग्रस्त वक्तव्य बेळगाव ग्रामीणचे भाजपचे आमदार संजय पाटील यांनी केलंय. पाटील यांच्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बेळगाव,ता.22 एप्रिल: कर्नाटकमधली विधानसभा निवडणूक  हिंदू-मुस्लिम अशीच आहे असं आपल्या प्रचारात म्हणणारे बेळगाव ग्रामीणचे भाजपचे उमेदवार संजय पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, माझ्या आजूबाजूला जे मला दिसतंय ते मी सांगतोय असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

इतकंच नाही तर हा देश हिंदुंचा आहे, मुस्लीमांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान तयार केला आहे असं वादग्रस्त वक्तव्यही पाटील यांनी केलंय. न्यूज18 लोकमतशी ते बोलत होते. लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसनं धार्मिक ध्रुवीकरण सुरु केलं असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

तसंच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा दावाही पाटील यांनी केला आहे. मी विकास केला म्हणूनच मला लोकांनी निवडून दिलंय असा दावाही पाटील यांनी केला आहे.

First published: April 22, 2018, 6:21 PM IST

ताज्या बातम्या