मराठी बातम्या /बातम्या /देश /

सत्ताधारी भाजपच्याच आमदाराला मिळेना बेड; पत्नीला 3 तास जमिनीवरच झोपवलं

सत्ताधारी भाजपच्याच आमदाराला मिळेना बेड; पत्नीला 3 तास जमिनीवरच झोपवलं

आमदारांच्या पत्नीला उपचाराची प्रतीक्षा करत जमिनीवर झोपावे लागत असेल तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल याचा विचार करावा लागेल.

आमदारांच्या पत्नीला उपचाराची प्रतीक्षा करत जमिनीवर झोपावे लागत असेल तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल याचा विचार करावा लागेल.

आमदारांच्या पत्नीला उपचाराची प्रतीक्षा करत जमिनीवर झोपावे लागत असेल तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल याचा विचार करावा लागेल.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 10 मे : उत्तर प्रदेशातील कोरोना स्थिती (Uttar Pradesh Corona) अतिशय बिकट झाली असून कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दररोज वाढतच आहे. या काळात राज्यातील आरोग्य सुविधांची स्थिती दयनीय असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच एका आमदाराने केलेल्या आरोपावरून दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने आग्रा येथील एसएन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप केला आहे.

फिरोजाबाद जनपद जसरानाचे आमदार राम गोपाल उर्फ ​​पप्पू लोधी (MLA Ramgopal lodhi) यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्गाची बाधा झाली आणि त्यांना उपचारासाठी SN Medical College Hospital ला रेफर करण्यात आले होते, परंतु पत्नीला बराच काळ रुग्णालयात खाटच न मिळाल्याने त्यांना 3 तास जमिनीवरच झोपावंं लागलं. याशिवाय त्यांनी आरोप केला आहे की, रुग्णालय प्रशासनाकडून पत्नीची प्रकृती कशी आहे सांगितलं जात नाही. खाण्यासाठी व्यवस्थित अन्न दिलं जात नाही, पाणीही दिलं जात नाही, डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन काहीच ठीक करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

30 एप्रिल रोजी अगोदर पप्पू लोधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी संध्या लोधी यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुरुवातीला त्यांना फिरोजाबादच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर तब्येत सुधारल्याने शनिवारी त्यांना आयसोलेशन वॉर्डमधून सोडण्यात आलं. परंतु त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्यानंतर 7 मे रोजी एसआर मेडिकल कॉलेज, आग्रा येथे रेफर करण्यात आले.

हे वाचा - लशीचे दोन्ही डोस घेऊनही मोहन जोशी यांना कोरोनाची लागण; मालिकेच्या शूटिंगसाठी होते गोव्यात

पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार, येथे त्यांच्या पत्नीला 3 तास जमिनीवरच झोपून रहावं लागलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर काही वेळाने त्यांना कसाबसा बेड उपलब्ध झाला. अजूनही त्यांची प्रकृती कशी आहे, त्या औषधांना प्रतिसाद देताहेत का? याविषयी काहीही सांगितले जात नाही. एसएन वैद्यकीय महाविद्यालय आग्रा, इथे रुग्णांना चांगले उपचार दिले जात नाहीत.

हे वाचा - काय म्हणावं हिला! म्हणे, मूल जन्माला घालणं वाटते मजा; सोळाव्या बाळाची आई होताच सतराव्या बेबीची तयारी

उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाची ही दयनीय स्थिती आहे, जिथे एखाद्या आमदारांच्या पत्नीला उपचाराची प्रतीक्षा करत जमिनीवर झोपावे लागत असेल तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल याचा विचार करावा लागेल. आग्र््यासारख्या मोठ्या शहरातील एसएन वैद्यकीय महाविद्यालयातील ही स्थिती आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Uttar pradesh news