या व्यक्तीच्या खांद्यावर लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी?

भाजप खासदार ओम बिर्ला आता लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 10:48 AM IST

या व्यक्तीच्या खांद्यावर लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी?

नवी दिल्ली, 18 जून : भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. ओम बिर्ला लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDAचे उमेदवार आहेत. ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावं देखील लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होती. पण, या सर्वांची नावे आता मागे पडली असून ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर बुधवारी ( उद्या ) संसदेमध्ये मतदान होईल. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.





दरम्यान, ओम बिर्ला यांच्या पत्नीनं हा क्षण अत्यंत आनंदाचा असल्याचं म्हटलं आहे.


AN-32 विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; पण ही आहे समस्या

सुमित्रा महाजन यांच्यानंतर ओम बिर्ला

2014मध्ये सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. पण, 2019ची लोकसभा निवडणूक न लढवल्यानं त्यांच्या जागी आता ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.


SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close