मराठी बातम्या /बातम्या /देश /

'अरे दम असेल तर घुसून दाखव', भाजप नेत्याने चक्क 'कोरोना'लाच दिलं चॅलेंज

'अरे दम असेल तर घुसून दाखव', भाजप नेत्याने चक्क 'कोरोना'लाच दिलं चॅलेंज

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) हाहाकार माजला आहे. भारतात (india) केंद्र आणि राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत भाजप नेत्याने (bjp leader) तर कोरोनाव्हायरसलाचा आव्हान दिलं आहे.

  • Published by:  Priya Lad

गाझियाबाद, 05 मार्च : एकिकडे जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) हाहाकार माजला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत भाजप नेत्याने तर थेट कोरोनाव्हायरसलाचा आव्हान दिलं आहे.

कोरोनामध्ये हिंमत असेल तर लोनीमध्ये (loni) घुसून दाखवावं, असं चॅलेंज लोनीचे आमदार नंद किशोर गुर्जर (Nand Kishor Gurjar) यांनी दिला आहे.

हे वाचा - भारतात 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, आता गाझियाबादमध्ये आणखी एक रुग्ण

भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी एका पत्रकाराला फोनवर दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे, जो व्हायरल झाला आहे.

"लोनीमध्ये रामराज्य आहे आणि इथं 9 गोशाळा आहेत, लोकंही धर्म-कर्माबाबत जागरूक आहेत. जिथं गाईचा वास तिथं जगातील कोणताच व्हायरस येऊ शकत नाही, असा दावा नंद किशोर गुर्जर यांनी केला. आमच्या इथं कोरोनाच नाही तर कोणताही व्हायरस येऊ शकत नाही", असं त्यांनी म्हटलं.

"कोणताही व्हायरस  मग तो मनुष्यरूपात का असेना जर त्याने इथल्या नागरिकांना त्रास दिला किंवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा कोणता आजार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी आम्हीच पुरेसे आहोत आणि त्याला ठीक करू. लोनीत कोणताही व्हायरस वाचणार नाही. लोनीत कोणताही व्हायरस येणार नाही, ही जबाबदारी आमची आहे", असंही ते म्हणाले.

हे वाचा - Coronavirus चा कहर! सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद, सरकारचा निर्णय

आमदाराशी न्यूज 18 ने बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपण कार्यक्रमात व्यस्त असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशातही कोरोनाव्हायरसबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये एका लोकप्रतिनिधीचं असं वक्तव्य करणं आश्चर्यकारकच आहे.

दरम्यान याआधीही एका भाजप आमदाराने कोरोनाव्हायरसबाबत असंच हैराण करणारं वक्तव्य केलं होतं. गोमूत्र, शेणामुळे कोरोनाव्हारस बरा होऊ शकतो असा दावा, आसाममधील भाजप आमदार (BJP MLA) सुमन हरिप्रिया (Suman haripriya) यांनी केला होता.

हे वाचा - गोमूत्र, शेणामुळे बरा होईल कोरोनाव्हायरस, भाजप आमदाराचा अजब दावा

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus india