मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! एक महिना सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, भाजप आमदाराचं निधन

धक्कादायक! एक महिना सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, भाजप आमदाराचं निधन

आमदार किरण माहेश्वरी यांची 28 ऑक्टोबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना उदयपूर इथल्या गीतांजली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

आमदार किरण माहेश्वरी यांची 28 ऑक्टोबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना उदयपूर इथल्या गीतांजली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

आमदार किरण माहेश्वरी यांची 28 ऑक्टोबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना उदयपूर इथल्या गीतांजली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Kranti Kanetkar

उदयपूर, 30 नोव्हेंबर : रिकव्हरी रेट चांगला असला तरी कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी होण्याचं नाव घेत नाही. कोरोनाविरुद्ध सुरू असणारी भाजप आमदाराची झुंज अखेर अपयशी ठरले. उपचारादरम्यान भाजपच्या महिला आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एक महिन्यापासून कोरोना संक्रमणाशी झुंज देत असलेल्या राजसमंदचे आमदार किरण माहेश्वरी यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

आमदार किरण यांच्यावर गुडगावच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांचं उपचारादरम्यान राजस्थानमधील गुडगाव इथल्या रुग्णालयात निधन झालं आहे. आमदार किरण माहेश्वरी यांची 28 ऑक्टोबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना उदयपूर इथल्या गीतांजली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची तब्येत आणखीन खालवल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचं डॉक्टरांनी देखील माहिती दिली होती.

हे वाचा-बड्या नेत्यांनी कोरोनाविरोधात युद्ध जिंकलं; POST COVID COMPLICATION ने घेतला जीव

पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदार किरण माहेश्वरी यांना ट्वीट करून श्रद्धांजली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरण माहेश्वरी यांच्या पार्थिवावर सोमवारी उदयपूर इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. राजसमंदच्या आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती मिळताच उदयपुरात शोकाकूल वातावरण आहे. वसुंधरा सरकार असताना किरण माहेश्वरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती.

27 नोव्हेंबरला शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  भारत भालके (Bharat bhalke) यांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला आणि गुंतागुंत निर्माण झाली. पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

First published:

Tags: BJP, Coronavirus