हैदराबाद 20 जून : एका पुतळ्याच्या उभारणीवरून हैदराबादमध्ये राजकीय तणाव निर्माण झालाय. भाजपचे गोशमहलचे आमदार टी राजा सिंग यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केलाय. त्यात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर पोलिसांनी घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध करून आमदारानेच डोक्यात दगड घालून स्वत:ला जखमी करून घेतल्याचा दावा केलाय. पोलिसांच्या या दाव्यामुळे आमदारांच्या म्हणण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.
हैदराबादच्या जुम्मेरात भागात स्वातंत्र्य सैनिक रानी अवंतीबाई लोध यांचा पुतळा उभारण्यावरून या वादाला सुरुवात झाली. भाजपचे आमदार राजा सिंग यांनी परवानगी न घेताच पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला असा दावाही पोलिसांनी केलाय. सिंग हे समर्थकांसह आले आणि त्यांनी पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला.
पुतळ्यासाठी पोलिसांची परवानगीच नसल्याने पोलिसांनी तो कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना पोलीस आणि आमदारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थोडा बळाचा वापर करावा लागला. मात्र पोलीस आमदाराला मारत असल्याचं दृष्यांमध्ये दिसत नाहीत. पोलिसांमुळे ते जखमी झालेत असंही त्यात दिसत नसल्याने आमदाराने स्टंटबाजी केली अशी आता टीका होतेय. आमदारानेच स्वत:ला मारून घेतलं असा दावा पोलीस उपायुक्त ए.आर श्रीनिवास यांनी केलाय. त्यांनीच ट्विटरवरून घेटनेचा व्हिडीओही ट्विट केलाय.
#Hyderabad
— Abhinay Deshpande|అభినయ్ देशपांडे (@AbhinayTheHindu) June 20, 2019
Lone BJP MLA @TigerRajaSingh was injured when he was allegedly attacked by @hydcitypolice, while trying install a new statue of Rani Avanti Bai Lodhi at Jumerat Bazar. @THHyderabad@BJP4India@BJPSocial@CPHydCity @TelanganaDGP @the_hindu pic.twitter.com/GPtdf5gu4H