राजस्थान, ११ ऑगस्ट- जगभरात जवाहरलाल नेहरू यांची ओळख पंडित नेहरू अशी आहे. मात्र 'जे नेहरू गोमांस खायचे ते पंडित असू शकत नाहीत,' असं विधान भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केले आहे. एवढे बोलून ते थांबले नाहीत तर अहुजा पुढे म्हणाले की, 'इंदिरा गांधींसोबत राहुल गांधी मंदिरात गेल्याचे काँग्रेस नेत्यांनी सिद्ध केले तर मी पदाचा राजीनामा देईन, असे आव्हान त्यांनी केले आहे. शुक्रवारी काँग्रेसवर टीका करताना अहुजा यांचा तोल गेला. जवाहरलाल गोमांस खायचे त्यामुळे ते कधीच पंडित नव्हते. गोमांस खाणारी व्यक्ती कधीच पंडित असू शकत नाही,' असे विधान त्यांनी केले.
#WATCH: BJP MLA Gyan Dev Ahuja says, "Nehru was not a Pandit. One who ate beef and pork, cannot be a Pandit". (10.08.18) pic.twitter.com/faltELOAgr
— ANI (@ANI) August 11, 2018
सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजस्थान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राजस्थानमधील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये जाणार आहेत. अहुजा यांच्या टीलेकला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, राहुल यांना देवळात जाण्याची शिकवण ही आजी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्याकडूनच मिळाली. काँग्रेसकडून आलेल्या या विधानावर अहुजा म्हणाले की, 'मी ७८ वर्षांचा आहे. माझ्या हयातीत राहुल गांधी आणि इंदिरा गांधी कधी देवळात गेल्याचे मला आठवत नाही. सचिन पायलट आणि इतर काँग्रेस नेत्यांनी माझा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करावे. तसे झाले तर मी लगेच पदाचा राजीनामा देईन.'
हेही वाचा-
राज ठाकरेंचे असेही काही निवांत क्षण!
VIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजी
रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा