VIDEO मोदींची स्तुती करताना भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले नेहरु होते अय्याश!

VIDEO मोदींची स्तुती करताना भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले नेहरु होते अय्याश!

'पंडित नेहरू हे अय्याश होते. फक्त तेच नाही तर सर्व नेहरु खानदान अय्याश होतं. राजीव गांधी यांनीही इटलीतल्या मुलीशी लग्न केलं. नेहरुंनी ब्रिटिशांच्या मदतीने देशाची फाळणी केली.'

  • Share this:

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) 18 सप्टेंबर : भाजपमधल्या वाचाळवीर नेत्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झालेत. आता नवा वाद निर्माण केलाय तो भाजपचे उत्तर प्रदेशातले आमदार विक्रम सिंग सैनी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सैनी यांनी Facebookवर एक पोष्ट टाकली. त्यावर वाद झाला. त्यानंतर स्पष्टीकरण देताना त्यांनी मोदींचं कौतुक करत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवरचं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होतेय. सैनी यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणलं होतं.

सैनी यांनी मोदींचा जागतिक नेत्यांसोबतचा एक जुना फोटो आपल्या Facebook पेजवर टाकला आणि मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत असं लिहिलंय. त्या फोटोत नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग या मोदींकडे बघत आहेत. तो संदर्भ देत त्यांनी लिहिलं की, हे मुर्ख, त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघू नको. ते मोदी आहेत. नेहरु नाहीत. त्यावर जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की, पंडित नेहरू हे अय्याश होते. फक्त तेच नाही तर सर्व नेहरु खानदान अय्याश होतं. राजीव गांधी यांनीही इटलीतल्या मुलीशी लग्न केलं. नेहरुंनी  ब्रिटिशांच्या मदतीने देशाची फाळणी केली अशीही मुक्ताफळही त्यांनी उधळलीत.

पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO

याआधीही अनेकदा भाजपच्या नेत्यांनी पंडित नेहरुंवर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली होती. त्यावरून वादही झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा वाचाळवीरांना अनेकदा फटकारलंही होतं मात्र त्यांची वक्तव्य काही कमी झालेली नाहीत.

चीनकडून पाकिस्तानला दणका

मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना दणकाच मिळाला. यातच आता पाकिस्तान सर्वात मोठा झटका मिळालाय. कारण पाकच्या कुरापतींची नेहमीच पाठराखण करणाऱ्या चीननं देखील आता साथ सोडल्याचं दिसत आहे.

लवकरच पाक व्याप्त काश्मीर भारताचा भौगोलिक भाग असेल; मंत्र्यांचे मोठ वक्तव्य!

काश्मीर मुद्यावर चर्चा नाही

येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग एका अनौपचारिक संमेलनात भेटणार आहेत. पण या भेटीदरम्यान काश्मीर मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. चीनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा करावी, हे पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात या दोघांची भेट होणार आहे.

First published: September 18, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading