भाजप कार्यालयात होळी खेळताना आमदारावर गोळीबार

भाजप कार्यालयात होळी खेळताना आमदारावर गोळीबार

भाजप आमदार आणि कार्यकर्ते पार्टी ऑफिसमध्ये होळी खेळण्यात मग्न असताना अचानक अामदाराच्या दिशेनं गोळी आली आणि तो कोसळला. उत्तर प्रदेशात लखिमपूरमध्ये ही घटना घडली. लखिमपूरचे भाजप आमदार योगेश वर्मा या गोळीबारात जखमी झाले.

  • Share this:

लखिमपूर (उत्तर प्रदेश), 21 मार्च : भाजप आमदार आणि कार्यकर्ते पार्टी ऑफिसमध्ये होळी खेळण्यात मग्न असताना अचानक अामदाराच्या दिशेनं गोळी आली आणि तो कोसळला. उत्तर प्रदेशात लखिमपूरमध्ये ही घटना घडली. लखिमपूरचे भाजप आमदार योगेश वर्मा या गोळीबारात जखमी झाले.

आमदार योगेश वर्मा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका कुणी केला, चुकून गोळी लागली की मुद्दाम कुणी गोळीबार केला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आमदार वर्मा यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्या प्रकृतीला आता धोका नाही, असं सांगण्यात आलं आहे. या घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेवरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.हा हल्ला कुणी मुद्दाम केला की, आपसातच रचलेला कट आहे यापासून अनेक तर्क लढवण्यात येत आहेत.

(ही बातमी अपडेट होत आहे. अधिक माहिती मिळाल्यावर बातमी अपडेट करण्यात येईल.)

First published: March 21, 2019, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading