मराठी बातम्या /बातम्या /देश /

MLA हॉस्टेलमध्ये भाजप आमदाराची फॉर्च्युनर तरुणाने पेटवली, घटनेचा LIVE VIDEO

MLA हॉस्टेलमध्ये भाजप आमदाराची फॉर्च्युनर तरुणाने पेटवली, घटनेचा LIVE VIDEO

BJP MLA Fortuner set on fire, incident caught in CCTV: भाजप नगरसेवकाची गाडी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीसटीव्हीत कैद झाली आहे.

BJP MLA Fortuner set on fire, incident caught in CCTV: भाजप नगरसेवकाची गाडी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीसटीव्हीत कैद झाली आहे.

BJP MLA Fortuner set on fire, incident caught in CCTV: भाजप नगरसेवकाची गाडी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीसटीव्हीत कैद झाली आहे.

  • Published by:  Sunil Desale

हरियाणा, 29 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची फॉर्च्युनर गाडी एका तरुणाने पेटवल्याची (MLA car set on fire) घटना समोर आली आहे. एमएलए हॉस्टेलमध्ये उभी असलेली ही गाडी रात्रीच्या सुमारास पेटवण्यात आली. ही संपूर्ण घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. आमदारांची गाडी पेटवल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरलं आणि एकच खळबळ उडाली. (BJP MLA Fortuner car set on fire in MLA Hostel Haryana)

माझ्याच गाडीला आग का लावली?

ही घटना हरियाणात घडली आहे. हरियाणातील पानीपत येथील भाजपचे आमदार प्रमोद विज यांची फॉर्च्युनर गाडी रात्रीच्या सुमारास पेटवण्यात आली. चंडीगढ येथील एमएलए हॉस्टेलमध्ये ही गाडी उभी होती आणि एका तरुणाने रात्रीच्या सुमारास गाडी पेटवली. हे एक षडयंत्र असल्याचं आमदार प्रमोद विज यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, त्या ठिकाणी इतरही गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. मग माझ्याच गाडीला आग का लावण्यात आली?

" isDesktop="true" id="650233" >

मंगळवारी हरियाणा मंत्रिमंडळाचा विस्तार होता. या मंत्रिमंडळ विस्तार समारोहात सहभागी होण्यासाटी आमदार प्रमोद विज हे चंडीगढ येथे आले होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्या गाडीला आग लागली असल्याची माहिती समोर आली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आमदार प्रमोद विज हे पंचकूला येथे थांबले होते. तर त्यांचा पीए आणि इतर स्टाफ हे चंडीगढ येथील एमएलए हॉस्टेलमध्ये थांबले होते. ही घटना एमएलए हॉस्टेलमध्ये घडली आहे.

वाचा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस, पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

घटनेचा सीसीटीव्ही आला समोर

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

तरुणाने पेटवली गाडी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक तरुण आमदार प्रमोद विज यांच्या गाडीजवळ येतो. त्यानंतर तो गाडीची काच फोडतो आणि मग गाडीला आग लावतो. पोलिसांनी आज हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याद्वारे पोलीस तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: BJP, Cctv footage, Crime, Haryana