मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्राच्या नेत्याचा उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का; प्रियांका गांधींना दिलं ‘गिफ्ट’

महाराष्ट्राच्या नेत्याचा उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का; प्रियांका गांधींना दिलं ‘गिफ्ट’

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला असून त्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला असून त्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला असून त्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलं आहे.

  लखनऊ, 14 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपाला हा धक्का देण्यामध्ये महाराष्ट्राच्या नेत्यानं मोठी भूमिका निभावली आहे. भाजप आमदार अवतारसिंह भडाना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता अवतारसिंह भडाना लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. अवतारसिंह भडाना यांनी आपला राजीनामा उत्तर प्रदेशच्या भाजप अध्यक्षांकडे सोपवला आहे. भडाना यांचा राजीनामा हा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  युपीतल्या धक्क्याचं महाराष्ट्र कनेक्शन

  उत्तर प्रदेशात भाजपला दिलेल्या धक्क्याचं महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आलं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून भंडारा – गोंदिया मतदार संघातून निवडून आलेले आणि आता घरवापसी केलेले नाना पटोले यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. काँग्रेसमध्ये येण्याकरता भडाना यांचं मन वळवण्यासाठी नाना पटोले यांनी यशस्वी प्रयत्न केले. शिवाय, राहुल गांधी यांच्या समोर देखील अवतार सिंह भडाना यांची बाजू मांडली. दरम्यान, अवतार सिंह भडाना फरीदाबादमधून लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आता समोर येत आहे.

  राहुल यांचा मास्टर स्ट्रोक

  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकीय प्रवेशामुळे राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळल्याचं राजकीय निरिक्षकांचं मत आहे. पण, प्रियांका यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला किती फायदा झाला याकरता निकालांची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील 41 तर, ज्योतिरादित्य यांच्या खांद्यावर 39 मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. प्रियांका गांधी देखील कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधत असून त्यांनी मॅरेथॉन बैठकांची मालिकाच सुरू केली आहे.

  नाना पटोले यांची मोदींवर टीका

  भाजपमधून बाहेर पडताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली होती.

  Pulwama Attack स्फोटात बसचे तुकडे झाले, अंगावर शहारे आणणारा VIDEO

   

   

   

  First published:
  top videos

   Tags: Avtarsigh Bhadana, Election express, Loksabha election2019