'पाकिस्तानची सून' सानिया मिर्झाला ब्रँड अॅम्बॅसिडर पदावरून काढून टाका, भाजप आमदाराची मागणी

'पाकिस्तानची सून' सानिया मिर्झाला ब्रँड अॅम्बॅसिडर पदावरून काढून टाका, भाजप आमदाराची मागणी

सानिया मिर्झा म्हणते, आम्ही सेलिब्रेटी आहे म्हणून देशभक्ती आणि देशाबद्दलची काळजी असल्याचं सिद्ध करावं लागतं.

  • Share this:

हैदराबाद, 18 फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. आता एका भाजप खासदाराने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना टेनिसस्टार सानिया मिर्झाला ब्रँड अॅम्बॅसिडर पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ती पाकिस्तानची सून असल्याने तिला या हटवण्यात यावे असं भाजपचे आमदार राजा सिंह यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ जवानांना वीरमरण आलं आहे या पार्श्वभूमीवर राजा सिंह यांनी अशी मागणी केली आहे.

राज सिंह यांनी म्हटलं आहे की, सानियाने भारतीय असल्याचा दावा केला कारण तीने एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केलं. तिला तेलंगणाच्या ब्रँड अँम्बॅसिडर पदावरून काढून सायना किंवा पीव्ही सिंधूला राजदूत करावे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 2014 मध्ये सानिया मिर्झाला तेलंगणाची ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलं होतं. सानिया मिर्झा अनेक कार्यक्रमात सहभागी होत असते. भाजपने सुरुवातीपासूनच याला विरोध केला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सानिया मिर्झाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की प्रसिद्ध व्यक्तिंनी या हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट केली पाहिजे. आपण देशभक्त असल्याचं आणि देशाची काळजी असल्याचं सिद्ध करण्यासाठी असं करावं. कारण आम्हा सेलिब्रेटी आहे. त्याचबरोबर तुमच्यातील अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे राग काढण्यासाठी काही नाही. तर द्वेष पसरवण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. मी आपल्या देशासाठी खेळते. यासाठी कठोर मेहनत घेते आणि अशीच देशाची सेवा करते. या मी आपल्या सीआरपीएप जवान आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे असं ट्वीट सानिया मिर्झाने केलं आहे.

भारताची टेनिसस्टार असलेल्या सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. सानियाच्या या ट्वीटनंतरही उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना दहशतवाद्यांवरचा राग कठोर शब्दांमधून बाहेर पडत आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपुरा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर आज भारताच्या सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत या हल्ल्यातील मास्टर माईंड गाजीसह दोघांचा खात्मा करण्यात आला.

First published: February 18, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading