Home /News /national /

भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या?

भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या?

भाजप आमदाराचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

    दिनाजपूर, 13 जुलै: भाजप आमदाराचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर दिनाजपूर इथल्या हेमताबादचे भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह आढळल्यानं खळखऴ उडाली. देवेंद्र यांचा मृतदेह त्यांच्याच गावात दोरीच्या सहाय्याने लटकलेला आढळला आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. देवेंद्र नाथ रॉय यांची हत्या केल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. देवेंद्र रॉय गेल्या वर्षीच सीपीएममधून भाजपमध्ये दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. उत्तर दिनाजपूरची राखीव जागा हेमताबाद येथील भाजपचे आमदार देवेंद्र नाथ रॉय यांना देण्यात आली होती. देवेंद्र यांना प्रथम मारलं असून नंतर अशा पद्धतीनं आत्महत्या भासवण्याचा अज्ञातांचा कट असल्याचा आरोप स्थानिक आणि भाजपमधील नेत्यांनी केला आहे. हे वाचा-महाराष्ट्र हादरला! मारहाण केल्याच्या रागातून मुलानेच केली वडील, भावाची हत्या भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह आढळल्यानं पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तपास सुरू आहे. नेमकी त्यांची हत्या झाली की आत्महत्या आणि आत्महत्या असेल तर का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. देवेंद्र रॉय यांची हत्या केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP, PM Naredra Modi, West bengal

    पुढील बातम्या