नक्षलवाद्यांच्या दबावापुढे न झुकता पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तिनं केलं मतदान

नक्षलवाद्यांच्या दबावापुढे न झुकता पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तिनं केलं मतदान

मतदानापूर्वी दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला करून IED स्फोट घडवला. त्यात 5 जवान शहीद झाले. त्याबरोबर भाजप आमदाराचाही मृत्यू झाला होता.

  • Share this:

दंतेवाडा (छत्तीसगड), 11 एप्रिल : छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला आणि त्यात 5 जवान शहीद झाले. शिवाय भाजप आमदारांचाही मृत्यू झाला. दिवंगत भीमा मंडावी या भाजप आमदारांची पत्नी ओजस्वी यांनी पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी मतदानासाठी बाहेर पडून लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली.

जिथे हा माओवादी हल्ला झाला तिथेच आज नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला झुगारून मतदानासाठी अशा रांगा लागल्या होत्या.

भाजप आमदार भीमा मंडावी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी श्यामगिरी इथली सभा संपवून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. तेच हे गाव. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथल्या जंगलात नक्षलवाद्यांनी दोनच दिवसांपूर्वी 9 एप्रिलला मोठा हल्ला घडवला होता.

नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून IEDचा स्फोट घडवला. यात पाच जवान शहीद झाले.

संबंधित बातम्या : निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी IED चा हल्ला घडवला तेच 'हे' गाव

गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर सुरक्षारक्षकांवर माओवाद्यांचा हल्ला, 3 जवान जखमी

दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; भाजप आमदाराचा मृत्यू, 5 जवान शहीद

नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्यामुळे परिसरात अलर्ट देण्यात आला आहे, तरीही इथल्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली तरीही आदिवासी नागरिकांनी त्याला न जुमानता मतदानासाठी अशा रांगा लावल्या. मंडावी यांची पत्नी ओजस्वी यांनीही मतदान करून आपण नक्षलवाद्यांच्या दबावापुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मतदानाला गालबोट लागलं.  गडचिरोलीमध्ये मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. एटापल्ली तालुक्यातल्या एका मतदार केंद्राजवळ माओवाद्यांनी हल्ला केला. त्यात तीन जवान जखमी झाले.

VIDEO : पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसाने थेट रोखली बंदूक!

First published: April 11, 2019, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading