Home /News /national /

'देशातील पेट्रोल -डिझेल दरवाढीला तालिबान जबाबदार', भाजपा आमदाराचा दावा

'देशातील पेट्रोल -डिझेल दरवाढीला तालिबान जबाबदार', भाजपा आमदाराचा दावा

देशात गेल्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol Diesel Rate) मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीला तालिबान (Taliban) जबाबदार असल्याचा दावा भाजपा आमदारानं (BJP MLA) केला आहे.

    मुंबई, 5 सप्टेंबर : देशात गेल्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol Diesel Rate) मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दर हा 100 रुपये प्रती लीटरपेक्षा जास्त आहे. तसंच डिझेल देखील महागले आहे. या दरवाढीला तालिबान (Taliban) जबाबदार असल्याचा दावा  भाजपा आमदारानं (BJP MLA) केला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी झालाय, त्यामुळे या किंमतीमध्ये वाढ झाली आहे, असा त्यांचा दावा आहे. अरविंद बेल्लाड (Arvind Bellad) असं या आमदारांचं नाव आहे. ते कर्नाटकातील हुबळी-धारवाडचे भाजपा आमदार आहेत. तालिबानचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर जगभरातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी झालाय. याचा फटका भारतालाही बसल्याचा त्यांचा दावा आहे. रविवारी मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.39 रुपये प्रती लीटर तर डिझेलची किंमत 96.33 रुपये प्रती लीटर आहे. तर दिल्लीमध्ये ही किंमत अनुक्रमे 101.34 रुपये आणि 88.37 रुपये इतकी आहे. देशात इंधनाची मागणी संमिश्र आहे. पेट्रोलच्या मागणीत सातत्यानं वाढ होत असून डिझलच्या मागणीत घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोलची मागणी कोरोना महामारीच्या पूर्वीचा स्तर ओलांडला आहे. RSSचा इन्फोसिसवर गंभीर आरोप; म्हणाले, कंपनीकडून नक्षलवादी, डावे यांना मदत या आकडेवारीनुसार या कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात 2.43 लाख टन पेट्रोलची विक्री केली आहे. एक वर्षापूर्वी या कालावधीत झालेल्या पेट्रोल विक्री पेक्षा याचे प्रमाण 13.6 टक्के जास्त आहे. पेट्रोलच्या विक्रीनं कोरोना महामारीपूर्वीची आकडेवारी देखील ओलांडली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये देशभरात  23.3 लाख टन पेट्रोलची विक्री झाली होती. डिझेलची मागणी मात्र 2019 च्या तुलनेत सध्या 9.8 टक्के कमी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Petrol and diesel price, Taliban

    पुढील बातम्या