‘बॅटमॅन’ आकाश विजयवर्गीयची पक्षातून हकालपट्टी? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

BJP MLA आकाश विजयवर्गीय प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 01:22 PM IST

‘बॅटमॅन’ आकाश विजयवर्गीयची पक्षातून हकालपट्टी? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 02 जुलै : भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदौरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटने केलेल्या मारहाणीची दखल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मंगळवारी ( आज ) भाजपच्या संसदीय गटाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही मुलगा असला तरी अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा शब्दात कानउघडणी केली. शिवाय, जामिनावर सुटल्यानंतर ज्या लोकांनी आकाश विजयवर्गीय यांचं स्वागत केलं त्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही. सर्वांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी कठोर भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. तसंच असा प्रकार पुन्हा होता कामा नये. ही बाब पक्षाच्या आणि देशाच्या हिताची नसल्याचं म्हणत आकाश विजयवर्गीय प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शनिवारी मिळाला जामीन

पालिका अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्यानंतर आकाश विजयवर्गीय यांची जामीनावर सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करत आनंदोत्सव साजरा केला होता. तर, कैलास विजयवर्गीय यांनी देखील आकाश विजयवर्गीय यांची बाजु घेतल्यानं देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण, नरेंद्र मोदी यांनी मात्र या प्रकरणात कैलास विजयवर्गीय आणि आकाश विजयवर्गीय यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

नरेंद्र मोदींनी अमित शहांच्या भाषणाचा VIDEO शेअर करून दिला हा सल्ला

काय आहे प्रकरण

Loading...

26 जून रोजी पालिकेचे अधिकारी जुनं बांधकाम पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे आकाश विजयवर्गीय देखील दाखल झाले. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखलं. पण, त्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्याचा राग आल्यानं आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केली होती. त्यामध्ये पालिका अधिकारी जखमी झाला. या अधिकाऱ्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...