Home /News /national /

भाजपच्या महिला आमदाराचं डेंग्यूमुळे निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपच्या महिला आमदाराचं डेंग्यूमुळे निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपच्या आमदार आशा पटेल यांचं डेग्यूमुळे निधन (BJP MLA Aasha Patel death) झालं आहे. त्यांनी 44 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

    अहमदाबाद, 13 डिसेंबर: गुजरातमधील भाजप आमदार आशा पटेल यांचं रविवारी निधन (BJP MLA Aasha Patel death) झालं आहे. त्यांना डेंग्यूची लागण (dengue) झाल्याने त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. रविवारी आमदार आशा पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच, अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे मृत आमदार आशा पटेल या महसाना जिल्ह्यातील उंझा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार होत्या. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ते म्हणाले की, "हे सांगताना मला अत्यंत दु:ख होत आहे की, उंझाच्या आमदार आशा पटेल या आता आपल्यात राहिल्या नाहीत. डेंग्यूच्या उपचारासाठी त्यांना जायडस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.'' हेही वाचा-निवडणूक हरला म्हणून उमेदवाराने मतदारांनाच दिली शिक्षा; Video समोर आल्यानंतर अटक त्यांनी पुढे सांगितलं की, आशा पटेल यांचं पार्थिव उंझा येथे नेण्यात येणार आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांना याठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. तर आज सोमवारी सिद्धपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विधानसभा स्पीकर राजेंद्र तिवारी यांनी सांगितलं की, डेंग्यूचे निदान झाल्याने पटेल यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं थांबवलं होतं. 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाल्या राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आशा पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत आशा पटेल या काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर, फेब्रुवारी 2019 मध्ये, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकून आपलं 'आमदार'पद कायम राखलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Gujrat

    पुढील बातम्या