भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? आजच्या बैठकीकडे लक्ष

भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? आजच्या बैठकीकडे लक्ष

अमित शहा पुढील काही महिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या महासचिवांसोबत मीटींग करतील. या बैठकीमध्ये बूथ स्तरापासून ते सदस्यता अभियानावर चर्चा केली जाईल. दरम्यान, नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यामध्ये काही महिन्यांचा काळ लागू शकतो. त्यामुळे अमित शहा यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहू शकते.

महराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर अमित शहा आपल्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद काम ठेवतील अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये देखील अमित शहा यांनी जोरदार प्रचार करत भाजपच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला होता. अमित शहा यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असला तरी त्यांना या पदावर कायम ठेवण्यात आलं आहे. 3 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात लज्जास्पद घटना, 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

राज्यांचे प्रमुख नेते बैठकीत

आजच्या बैठकीमध्ये भाजपचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. यामध्ये 3 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीतीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

CycloneVayu Update : गुजरातमध्ये 6 लोकांचा मृत्यू

राज्याचा प्रदेशाध्यक्ष कोण?

रावसाहेब दानवे हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी देखील नव्या नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या जागी कुणाची नेमणूक होणार? हे देखील पाहावं लागणार आहे.

CycloneVayu: चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होणार?

First published: June 13, 2019, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading