भाजपच्या बैठकीत ठरला मोदींसाठी मतदारसंघ, निवडणूक जिंकण्यासाठी 'हा' आहे मास्टरप्लॅन

भाजपच्या बैठकीत ठरला मोदींसाठी मतदारसंघ, निवडणूक जिंकण्यासाठी 'हा' आहे मास्टरप्लॅन

मागील निवडणुकीत आमच्यासोबत 16 घटकपक्ष होते तर येणाऱ्या निवडणुकीत 29 पक्ष आमच्या सोबत असतील, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मार्च : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून रणनीती आखण्यात आली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबतही मोठी खलबतं झाली. नरेंद्र मोदी वाराणसी हा आपला एक मतदारसंघ कायम ठेवतील तर ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

भाजपने आगामी निवडणुकीत मित्रपक्ष जोडण्यावर सर्वाधिक भर दिल्याचं पाहायला मिळतंय. कार्यकारणीच्या बैठकीतही यावरच अधिक जोर दिला जावा, असा सूर उमटला आहे. मागील निवडणुकीत आमच्यासोबत 16 घटकपक्ष होते तर येणाऱ्या निवडणुकीत 29 पक्ष आमच्या सोबत असतील, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

विजयी उमेदवारांवर भर

जोर उमेदवार विजय खेचून आणू शकेल, अशाच उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांचा पत्ता भाजपकडून कट करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या बैठकीत या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. जिंकण्याची क्षमता असणाऱ्या सर्व उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.

काय असणार प्रचाराचा अजेंडा?

पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रवादावर गेलेला फोकस कायम ठेवून निवडणूक प्रचारात तो कसा उतरवायचा, याबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा मेसेज नेत्यांकडून तळागाळापर्यंत कसा घेऊन जाता येईल, याबाबतही खलबतं झाल्याची माहिती आहे.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 9, 2019, 9:17 AM IST

ताज्या बातम्या