News18 Lokmat

भाजपकडून तिकीट कापण्याची शक्यता, 'या' नेत्यांना बसणार धक्का!

उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2019 08:18 AM IST

भाजपकडून तिकीट कापण्याची शक्यता, 'या' नेत्यांना बसणार धक्का!

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 8 मार्च : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे पक्ष टाळू शकतो. आज होणाऱ्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय होईल, अशी माहिती आहे.

असा निर्णय झाला तर भाजपच्या अनेक नेत्यांनी झटका बसणार आहे. यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगत सिंह कोश्यारी, भुवन चंद खंडुरी, शांता कुमार, हुकुमदेव नारायण यादव, बिजया चक्र वर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाणार, हे निश्चित आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या 15 उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. या यादीत गुजरातमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजीअध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे. तर राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत पटेल हे 1997 ला एमएस विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांची बडोदामधून काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या कारकिर्दीतच स्थानिक पालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक होती. परंतु, पटेल हे पाटीदार समुहाचे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमधील पाटीदार समुहांची लोकसंख्या पाहता पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Loading...

ही आहे काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश

सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात

प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात

तारखांची लवकरच होणार घोषणा

देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार सभांची सुरूवातही झाली आहे. असं वातावरण असताना निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणं अपेक्षीत होतं. मात्र, भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे त्यात थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. आता 7 ते 10 मार्चच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आयोगाची गेले काही महिने जोरदार तयारी सुरू होती. त्यामुळे या तारखांची आता केव्हाही घोषणा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे.


VIDEO : अर्जुन खोतकरांच्या बंडावर भाजप नेते सुभाष देशमुख म्हणतात...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...