S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मंचावरील मोदींच्या उपस्थितीने बदलला गडकरींचा सूर, नेहरू-इंदिरांवर जोरदार टीका
  • VIDEO: मंचावरील मोदींच्या उपस्थितीने बदलला गडकरींचा सूर, नेहरू-इंदिरांवर जोरदार टीका

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 11:39 AM IST | Updated On: Jan 12, 2019 11:54 AM IST

    नवी दिल्ली, 12 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद दोन दिवसांपासून सुरू आहे. या परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 'जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी 'गरिबी हटाओ'चा नारा दिला. पण गरिबी गेली नाही,' असं म्हणत गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना गडकरींनी नेहरू-इंदिरांवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close