मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजपची नवी खेळी; माजी शिवसैनिक उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, सुरेश प्रभूंना उमेदवारी?

भाजपची नवी खेळी; माजी शिवसैनिक उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, सुरेश प्रभूंना उमेदवारी?

सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली.

सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली.

सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 08 जुलै : माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) हे भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सुरेश प्रभूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दक्षिण भारतात कमळ फुलवण्याचं स्वप्न पूर्ण होणार? आता भाजपने सुरू केलं 'ट्रिपल सी' फॉर्म्युल्यावर काम काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली. १९९८, १९९९ या सालच्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री होते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरेश प्रभू नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष होते. २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरेश प्रभू यांना राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना भाजपमध्ये आणत सर्वांनाच धक्का दिला. 'मोदी सरकार'मधल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही 'शिंदें'चं वजन वाढलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली. केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अशात आता भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
First published:

Tags: Amit Shah, Shivsena

पुढील बातम्या