शरद पवार यांचे नरेंद्र मोदींसंदर्भात मोठं भाकित, म्हणाले...

शरद पवार यांचे नरेंद्र मोदींसंदर्भात मोठं भाकित, म्हणाले...

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठ भाकित वर्तवले आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो, पण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत', असे भाकित शरद पवार यांनी मंगळवारी (12 मार्च) वर्तवले आहे. शरद पवार असंही म्हणाले की, 'जेवढे राजकारण मला समजते, त्यानुसार मला असं वाटत नाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मी काही ज्योतिषी नाही, पण भाजपला सत्तेत येण्यासाठी जेवढ्या जागांची आवश्यकता आहे, तेवढ्या मिळणार नाहीत'.

'लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप हा पक्ष मोठा पक्ष ठरेल. पण भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल, असे मला वाटत नाही. त्यांना आधीच्या तुलनेत कमी जागा मिळतील. निवडणुकीत सर्वाधिक मोठा पक्ष ठरूनही भाजपला हवा असलेला नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणार नाही. सत्ता मिळवण्यासाठी भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि जर असे घडलं तर भाजपला नवीन पंतप्रधान शोधावा लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान, शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सोमवारी (11 मार्च) स्पष्ट केले. 'एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक रिंगणात यायचे याला मर्यादा आहेत. यासंदर्भात कुटुंबात चर्चा केली. नवीन पिढीला संधी मिळावी, यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला', असे पवारांनी सांगितले.

विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार - शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे. पवार म्हणाले, माझ्या घरातल्या मुलाचा हट्ट मी पुरवला. मात्र विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार? तो हट्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. पवारांच्या या टिप्पणीवरून त्यांनी नेमकं काय राजकारण झालंय यावरही भाष्य केलंय. तसेच सुजय विखे हे काही राज्य पातळीवरचं नेतृत्व नाही, त्यांचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. मी हट्ट पुरवला असता तर विखेंना काय वाटलं असतं. मुलाचा हट्ट इरांनी का पुरवावा.दरम्यान प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत कधीच नव्हते. शेतकरी संघटने बरोबर चर्चा झाली आहे मार्ग निघेल असेही त्यांनी सांगितले.

नगरच्या जागेसाठी सुजय हे आग्रही होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने ती त्यांनी काँग्रेससाठी सोडली नव्हती. पवार आणि विखे यांचं राजकारणात जुणं भांडण आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करूनही राष्ट्रवादीने ती जागा सोडली नाही. पवारांनी नगरची जागा न सोडून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातं. एक म्हणजे त्यांनी विखेंचा हिशेब चुकता केला तर विरोधीपक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला धक्का बसला.

VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्यांदा 'मातोश्री'वर

First published: March 13, 2019, 6:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading