News18 Lokmat

हार्दिक पटेल यांना आव्हान देण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

पटेलांच्या आरक्षणावरून आंदोलन करणारे गुजरातमधले नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पण ते मतांची गणितं जुळवून विजय मिळवू शकतील का हा प्रश्नच आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 08:41 PM IST

हार्दिक पटेल यांना आव्हान देण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

अहमदाबाद, 11 मार्च : गुजरात विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्दिक पटेल यांनी आश्यर्यकारकरित्या काँग्रेसकडून जामनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच भाजपने त्यांचा सामना करण्यासाठी विशेष प्लॅन बनवला आहे.

जामनगरमध्ये सत्वरा, पटेल, अहिर, मुस्लीम, दलित आणि क्षत्रिय मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या सगळ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय. या समाजाच्या नेत्यांना आपल्याकडे वळवून हार्दिक पटेल यांना टक्कर देण्याचा हा प्लॅन आहे.

जामनगर लोकसभा मतदारसंघातल्या 4 विधानसभेच्या जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत तर 3 जागा भाजपकडे आहेत.

जामनगर लोकसभा मतदारसंघात 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. पण त्याआधी ही जागा भाजपकडे होती.

पाटीदार अमानत आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे राजकारणात सक्रिय झाले. 2016 मध्ये त्यांनी भाजपच्या आनंदीबेन पटेल सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. पटेल समुदायाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, अशी त्यांची मागणी होती. शिक्षण आणि नोकरीत आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी मोठमोठया सभा घेतल्या.

Loading...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पटेल समुदायाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांची राजकीय समीकरणं बदलली होती पण आता मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

मध्यंतरी, हार्दिक पटेल ज्या पटेल समुदायातून येतात त्या पटेल समुदायाने नरेंद्र मोदींना एका सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. मोदींनी अहमदाबादमधल्या या समाजाच्या मंदिराचं भूमिपूजन केलं. पटेल समुदाय मोदींच्या बाजूने आहे हेच या समुदायाला दाखवायचं होतं.

गुजरात विधानसभेनंतर आता दीड वर्षांनी लोकसभा निवडणूक होतेय. या बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसला हार्दिक पटेलचा करिश्मा किती उपयोगी पडेल हे पाहावं लागेल.

==============================================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...